Goat Farming
Goat Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेतकरी नियोजन- शेळीपालन

टीम ॲग्रोवन

नाव ः बंडोपंत बाळू हराळे

गाव ः खुपिरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर.

एकूण शेळ्या व मेंढ्या ः ४५

शेळ्याची जात ः आफ्रिकन बोअर

मेंढ्याची जात ः नारीसुवर्णा

मी मागील आठ वर्षांपूर्वी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन (Goat Farming) व्यवसाय सुरू केला. त्या पूर्वी शेळ्यांच्या (Goat Breed) विविध जाती आणि शेळीपालनातील सर्व बाबींचा अभ्यास केला. मला त्यातून आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्यांचे (African Boar Goat) संगोपन आणि अर्थशास्त्र योग्य वाटले. एका शेळीपासून सुरुवात करत पुढे टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवत नेली. त्याच प्रमाणे नारी सुवर्णा जातीच्या मेंढीचे पालनही करत आहे.

आज फार्ममध्ये लहान-मोठ्या मिळून ४५ शेळ्या व मेंढ्या आहेत. उत्तम पैदासीसाठी आफ्रिकन बोअर जातीचा १ बोकड आहे. मांसापेक्षाही फार्मचा मुख्य व्यवसाय पैदाशीचा ठेवला आहे. राज्यभरात मागणीनुसार जातिवंत शेळ्यांची विक्री केली जाते. मागील ८ वर्षांच्या शेळीपालनातील अनुभवातून फार्ममधील सर्व कामे आता करणे सोपे झाले आहे. फार्ममधून वर्षाला साधारण ३० ते ४५ नगांपर्यंत पिल्लांची विक्री होते. मादी व नर किलोप्रमाणे विक्री होते. पिले साधारण २० ते २५ किलोची झाल्यानंतरच त्यांची किलो प्रमाणे विक्री केली जाते.

व्यवस्थापनातील बाबी

शेळ्या या तुलनेने काटक असल्या तरी वेगाने वजन वाढण्यासाठी अधिक नियोजनपूर्वक व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी संतुलित खाद्याचा पुरवठा करावा लागतो. त्यांच्यासाठी पूर्णतः सुक्या चाऱ्याचे नियोजनही करावे लागते. सुक्या चाऱ्यासाठी वर्षभर पुरेल इतके तूर, सोयाबीन भुसकट आधीच खरेदी करून ठेवले जाते. विजापूर येथून वर्षभर पुरेल एवढे तुरीचे भुसकट खरेदी केले जाते. प्रतिदिन प्रति शेळी साधारण ३ किलो सुका चारा लागतो.

दैनंदिन नियोजन

फार्ममध्ये सकाळी ६ वाजल्यापासून काम सुरू होते. सुरुवातीला शेळ्या बाहेर काढून फार्म स्वच्छ केला जातो.

त्यांना सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा खुराक दिला जातो. या मध्ये सकाळी प्रामुख्याने मका, शेंगदाणा पेंड असा खुराक प्रत्येकी १५० ग्रॅम प्रमाणे दिला जातो. त्यानंतर अकरा वाजता सुका चारा दिले जाते. सोयाबीन, तूर भुसकट आलटून पालटून दिले जाते. या भुसकटामुळे शेळ्या भरपूर पाणी पितात.

वर्षातून तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण वैद्यकीय सल्ल्यानुसार केले जातात.

पिले जन्मल्यानंतर त्यांना स्वच्छ केले जाते. नाळ व्यवस्थित कापून आयोडीन लावले जाते. नवजात पिल्लांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घ्यावी लागते.

पुढील नियोजन ः

एक महिन्यापूर्वी लाळ्या खुरकतचे लसीकरण झाले आहे. सध्या कधी थंडी तर कधी ढगाळ हवामान असे वातावरण आहे. गोठा बंदिस्त असल्याने पावसाळा वगळता बाहेरील हवामानाचा फारसा परिणाम शेळ्यावर होत नाही. एप्रिल महिन्यात पुढचे लसीकरण आहे.

बंडोपंत बाळू हराळे,

९७६५१९६०७०

(शब्दांकन ः राजकुमार चौगुले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री पडली महाग

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT