Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’वर लवकरच मोफत लसीची व्यवस्था

लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. घाबरून बाहेरील खासगी लस घेऊ नये. गाय आणि म्हैस या जनावरांना सरकारतर्फे मोफत लस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

सांगली ः लम्पी स्कीन आजाराच्या (Lumpy Skin Disease) पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. घाबरून बाहेरील खासगी लस (Lumpy Skin Vaccine घेऊ नये. गाय आणि म्हैस या जनावरांना सरकारतर्फे मोफत लस (Free Lunpy Skin Vaccine) देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजारासंदर्भात गुरुवारी (ता. १५) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. दयानिधी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे, अधिकारी डॉ. किरण पराग आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘जिल्ह्यात ३ लाख २४ हजार ७५६ गाई तर ४ लाख ९३ हजार ९५८ म्हशी आहेत. या जनावरांना वगळता इतर जनावरांना हा आजार होत नाही. वाळवा, मिरज आणि पलुस या तीन तालुक्यांत ३८ जनावरांत हा आजार आढळून आला आहे. आतापर्यंत एकाही जनावराचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे घाबरून बाहेरील खासगी लस घेऊ नये. आतापर्यंत २० हजार जनावरांना लस दिली आहे. बाकी जनावरांनाही टप्प्याटप्प्याने मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी इतर विभागातील तीनशे कर्मचारी घेतले असून सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.’

ते म्हणाले, की जनावरांना सुरवातीचे १० ते १५ दिवस कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यानंतर डोळे आणि नाकातून पाणी येणे, ताप येणे, त्वचेवर पट्टे ही लक्षणे दिसून येतात. लम्पीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा लम्पी त्वचा आजारासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. लम्पी झालेल्या जनावरांचे दूध वापरू नये. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. लम्पी आजाराचा माणसांना धोका नाही. मात्र दूध घेतल्यानंतर ते उकळून घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT