Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : पुणे जिल्ह्यात आजपासून लाळ्या खुपरूत लसीकरण मोहीम

FMD Disease : अनेकदा लाळ खुरकूतची लागण होऊन पशुपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे असते.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील दुभत्या जनावरांना लाळ खुरकूतची लागण होऊ नये म्हणून सोमवारपासून (ता. १७) लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. अनेकदा लाळ खुरकूतची लागण होऊन पशुपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे असते.

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने अगोदर कारखान्यांच्या परिसरातील गावांमध्ये प्रामुख्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख जनावरांचा बाजार असलेल्या परिसरातील गावांमधील जनावरांच्या लसीकरणावरही भर देण्यात येणार आहे.

दुभत्या जनावरांना या रोगाचा फटका बसतोच, परंतु बैलांना या रोगाची लागण झाल्यानंतर त्यांची काम करण्याची क्षमता देखील क्षीण होते. परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे आणि लाळ खुरकूतमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येते. हा रोग पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी वर्षातून दोन वेळा लसीकरण करण्यात येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पुण्यात पूर्वीच्या पशुगणनेनुसार ११ लाख ४० हजार जनावरे आहेत, त्या सर्व जनावरांसाठी आवश्यक लसीचा साठा प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात पोचला आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात सर्व ठिकाणी लसीकरणास सुरुवात होणार आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये मार्च २०२२ नंतर लाळ खुरकूतची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली नसली, तरी त्यानंतर साथ स्वरूपात नसली तरी काही गोठ्यांवर जनावरांना रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लाळ खुरकूत हा रोग विषाणूजन्य असून गाय, बैल, म्हैस आदी पशूंसाठी घातक असणाऱ्या रोगावर ही लस फायद्याची आहे.

लाळ खुरकूतने काय होऊ शकते?

जनावरांना ताप येणे, तोंडाला फोड येऊन जखमा होणे, खुरांना जखमा होणे अशी त्याची लक्षणे आहेत. त्यामुळे जनावरे काही खाऊच शकत नसल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन पशुधन दगावते. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्याने होतो. लाळ खुरकूत रोगाची लागण झाल्याने जनावरांचे खाणे-पिणे बंद होते.

जनावरांना ताप येतो. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे कल आहे. अनेकांची रोजीरोटी ही दुधाळ जनावरांवर आहे. दुधाळ जनावरांना रोगाची लागण दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस दूध उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते.

शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन डॉक्टरांकडून लसीकरण करण्यात येणार आहे. पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. लाळ खुरकूतची प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ४५ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी पुरेशी लस उपलब्ध झाली आहे.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT