FMD Of Animal Agrowon
काळजी पशुधनाची

FMD Of Animal : जनावराला लाळ्या - खुरकूत रोगाची लस दिली का?

राज्यात आता बऱ्यापैकी थंडी पडत आहे. त्यातच साखर कारखान्यांचा गळीत हंगामदेखील सुरू झाला आहे. हा काळ लाळ्या खुरकूत रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे.

Team Agrowon

राज्यात आता बऱ्यापैकी थंडी पडत आहे. त्यातच साखर कारखान्यांचा गळीत हंगामदेखील सुरू झाला आहे. हा काळ लाळ्या खुरकूत (FMD) रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे. याच काळात लंपी स्किन रोगामुळे जनावरांतील इतर रोगांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जनावरांमध्ये लाळ्या खूरकूत या घातक रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. लाळ्या खुरकूत हा अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. यासह बैलांची कार्य करण्याची शक्ती कमी होते. सोबत लहान वासरे, रेडके यांच्यात मोठ्या प्रमाणात मरतुक होत असल्यामुळे दोन-चार जनावरे असणाऱ्या पशुपालकांचे या रोगामुळे प्रचंड नुकसान होते. ‘पिकोर्ना हिरिडी’ या कुळातील 'अप्थो व्हायरस' या विषाणूमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. यांचे बरेच उपप्रकार आहेत. हा विषाणू सामान्य निर्जंतुकीकरण द्रावणास दाद देत नाही. कमी तापमानात अनेक दिवस जिवंत राहतो. त्याचा प्रसार प्रामुख्याने हवेमधून, दूध, शेण, लघवी, वीर्य, पाणी पिण्याच्या जागा, गोठ्यात वापरत असलेली भांडी त्याचबरोबर बाधित जनावरांचा संपर्क येऊ शकणाऱ्या जागा म्हणजे जनावरांचे बाजार, यात्रा, पशू प्रदर्शने, साखर कारखान्याचे हंगाम त्याचबरोबर स्थलांतरित पक्षीदेखील या रोगाचा प्रसार करू शकतात.

रोगाची लक्षणे काय आहेत  

तोंडातून लाळ गळणे.

तोंडामध्ये आणि पायांच्या खुरांमध्ये व्रण येणे. 

तोंडामध्ये व्रण झाल्याने जनावरांचा आहार मंदावतो. 

जिभेला चट्टे पडतात. 

खुरांमध्ये झालेल्या जखमांवर माशा अंडी घालतात, त्यामुळे जखमा अधिक चिघळतात.

जनावरांना चालण्यात अडथळे निर्माण होतात. 

जनावर अचानक आजारी पडते.  

वजनात व दुग्धोत्पादनात घट होते. 

हा एक संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार वाढत असतो.

प्रतिबंधात्मक उपाय - उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय आहे. 

उपचार  

आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. 

जखमांवर योग्य ते प्रतिजैविक मलम लावावे.

तोंडामधील व्रण पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.

झालेल्या जखमांना नियमितपणे मलमपट्टी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT