Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : साताऱ्यात पाच जनावरांचा मृत्यू

आतापर्यंत पाच जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकूण १४९ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : गेल्या १५ दिवसांपासून लम्पी स्कीन (Lumpy Skin)आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा फलटण, सातारा, कऱ्हाड, खटाव तालुक्यांतील २७ गावांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत पाच जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू (Animal Death Due To Lumpy Skin) झाला आहे. तर एकूण १४९ जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. एकूण ३० हजार ६०० जनावरांचे लसीकरण (Animal Vaccination) करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहारयांनी दिली.

कऱ्हाड तालुक्यात वाघेरी येथे ११, फलटण तालुक्यात खामगाव ३, जिंती १३, फडतरवाडी ३, चव्हाणवाडी ६, पाडेगाव ६, सोनवडी ८, कुरवली बुद्रूक ७, धुळदेव १, फरांदवाडी ४, आसू ७, हनुमंतवाडी ७, गिरवी २, डोंबाळवाडी १,सातारा तालुक्यात कोडोली (पांढरवाडी) ८, महागाव ११, खटाव तालुक्यात अनपटवाडी २२, मानेवाडी ५, मोराळे ५, धोंडेवाडी ५, राजापूर २, खटाव २,कलेढोण १, कटगुण १, गणेशवाडी औंध २, निमसोड २, पडळ ४ अशा २७ गावांमध्ये १४९ प्रादुर्भावग्रस्त जनावरे आढळून आली आहेत.

वाघेरी (ता. कऱ्हाड) येथे एक, फलटण तालुक्यातील जिंती, सोनवडी व हनुमंतवाडी येथे अनुक्रमे एक, मानेवाडी (ता. खटाव) येथे एक अशा पाच जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

Kharif Crop Loss: पावसाच्या खंडाने खरीप पिके संकटात

e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT