Pest Management : किडींच्या जैविक नियंत्रणात तपासली मुंग्यांची उपयुक्तता

मुंग्या या सर्वसामान्यपणे चांगल्या भक्षक असल्याने अनेक छोट्या किडींचा फडशा पाडतात. परिणामी, पिकांचे नुकसान टळत असल्याचा निष्कर्ष एका सविस्तर अभ्यासामध्ये काढण्यात आला आहे.
Biological Pest Management
Biological Pest ManagementAgrowon
Published on
Updated on

कोणत्याही कीडनाशकाच्या (Pesticide) तुलनेमध्ये मुंग्या पीक उत्पादनामध्ये (Crop Production) अधिक कार्यक्षम ठरू शकतात, असा दावा ब्राझीलियन संशोधकांनी केला आहे. मुंग्या या सर्वसामान्यपणे चांगल्या भक्षक असल्याने अनेक छोट्या किडींचा फडशा (Pest Eater) पाडतात. परिणामी, पिकांचे नुकसान (Crop Damage) टळत असल्याचा निष्कर्ष एका सविस्तर अभ्यासामध्ये काढण्यात आला आहे. ‘पीक उत्पादनामध्ये मुंग्यांचे योगदान’ हा अभ्यास ‘प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटी बी’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

Biological Pest Management
Crop Protection : पीक संरक्षणासाठी ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्यांचा वापर

पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होत असते. पीक संरक्षणासाठी एकत्मिक कीड व्यवस्थापन पद्धती वापरण्याची शिफारस असली तरी शेतकरी सामान्यतः रासायनिक घटकांच्या वापराला अधिक प्राधान्य देतात. त्यातून कीड तात्पुरती नियंत्रणात येत असली तरी रासायनिक घटकांच्या वापराचे एक चक्र तयार होते. त्याचा शेतीतील अन्य उपयुक्त मित्रकीटक आणि सजीवांनाही फटका बसतो. हे टाळण्यासाठी अधिक नैसर्गिक अशा जैविक कीडनियंत्रण पद्धतीचा वापर करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. जैविक कीडनियंत्रणामध्ये मुंग्या कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतात, या अनुषंगाने नुकताच एक प्रदीर्घ अभ्यास करण्यात आला. कारण शेती आणि वन परीसरामध्ये मुंग्यांची जैवविविधता मोठी असून, त्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामुळे किडींच्या वेगवेगळ्या प्रकारावर नियंत्रणामध्ये नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

..असे आहे संशोधन

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि ब्रिटन येथील संत्रावर्गीय पिके, आंबा, सफरचंद आणि सोयाबीन अशा १७ पिकांचा अभ्यास करण्यात आला. - ब्राझीलमधील संशोधकांनी वनस्पतींजवळ आढणाऱ्या मुंग्याच्या २६ प्रजातींच्या वसाहतींचे निरीक्षण केले. या मुंग्या झाडांवर, बुंध्यात आणि बुंध्यानजीक जमिनीत वारूळ करून राहतात. विशेषतः बहुपीक पद्धतीमध्ये किंवा कृषी वानिकीमध्ये (जिथे जंगल आणि शेती एकत्र केली जाते.)

Biological Pest Management
Crop Protection : पीक संरक्षण आधुनिक; पण महाग होणार

मुंग्याच्या वसाहती अधिक आढळतात. कारण अशा ठिकाणी मुंग्याच्या वास्तव्यासाठी आणि खाण्यासाठी आवश्यक घटकांची उपलब्धता होते. शेतीमध्ये पीक संरक्षणाच्या दृष्टीने मुंग्यांच्या वसाहती निर्माण होण्यासाठी योग्य प्रमाणात झाडे, अधिवास अनुकूल वातावरण तयार करण्याची आवश्यकता दिसून आली. - संशोधकांनी विविध ठिकाणच्या पीक व कीडनियंत्रण पद्धतींचाही अभ्यास केला. विशेषतः ज्या ठिकाणी खोलवर मशागतीसाठी मोठ्या यंत्राचा वापर आणि रासायनिक पद्धतींने पीक व्यवस्थापन केले जाते अशा ठिकाणी मुंग्याच्या वसाहती नष्ट होतात. परिणामी, पिकांमध्ये मुंग्याची संख्या व वावर कमी होतो. अशा ठिकाणी किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. - पृथ्वीवर कीटकांद्वारे तयार केल्या जाणाऱ्या एकूण बायोमासपैकी अर्धा बायोमास हा फक्त मुंग्याद्वारे तयार केला जातो. चीनमध्ये कित्येक शतकांपासून लिंबूवर्गीय फळपिकांत कीड नियंत्रणासाठी मुंग्याचा वापर होत आहे. तसेच इतर देशांमध्येही विविध पिकांमधील कीड नियंत्रणासाठी मुंग्याचा वापर होत आहे.

विरोधी बाजू

जगभरात मुंग्याच्या सुमारे १४ हजार पेक्षा अधिक प्रजाती ज्ञात आहेत. या मुंग्या कोणतेही खाद्यपदार्थ, मृत किंवा जिवंत कीटकांना खाऊन उपजीविका करतात. शेती आणि कीडनियंत्रणासाठी मुंग्या पूर्णपणे उपयुक्त असल्याची बाब अद्याप स्पष्ट नाही. कारण अनेक वेळा मुंग्यांमुळे अनेक समस्या तयार होत असल्याचे दिसून येते. उदा. मिलीबग, मावा, पांढरी माशी अशा रसशोषक किडीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड व चिकट पदार्थांकडे मुंग्या आकर्षित होतात. या गोड पदार्थाच्या बदल्यामध्ये मुंग्या या किडींचे एका जागेवरून दुसरीकडे वहन करणे, अन्य भक्षकांपासून संरक्षण करताना दिसतात.

या अभ्यासात कीड नियंत्रणासाठी मुंग्याच्या काही प्रजाती अधिक प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले. मात्र त्यासाठी पीक व्यवस्थापनात व पद्धतीमध्ये काही बदल करून मुंग्यांच्या वसाहती शेती परिसरामध्ये तयार होण्यासाठी पोषक घटकांची उपलब्धता केली पाहिजे. पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक घटकांवरील अवलंबित्व कमी करून जैविक घटकांचा वापर वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. - डॉ. डिएगो अंजोस, प्रमुख संशोधक, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ उबरलँडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com