Poultry Diseases Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Management : वाढत्या उन्हात असं टिकवून ठेवा कोंबड्यांतील अंडी, मांसाच उत्पादन

Poultry Farming : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो. ज्याचा थेट परिणाम कोंबड्यांतील अंडी आणि मांस उत्पादनावर होतो. या समस्येवर उपाय म्हणून कोंबड्यांच्या निवाऱ्यात योग्य तापमान नियंत्रण करणं अत्यंत महत्वाचं आहे.

Team Agrowon

Egg Production : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो. ज्याचा थेट परिणाम कोंबड्यांतील अंडी आणि मांस उत्पादनावर होतो. या समस्येवर उपाय म्हणून कोंबड्यांच्या निवाऱ्यात योग्य तापमान नियंत्रण करणं अत्यंत महत्वाचं आहे.

कोंबड्यांच्या शेडमध्ये कुलर, पंखे, किंवा धुके फॉगर्स लावणे या सारख्या उपायांचा अवलंब करावा. तसंच कोंबड्यांना थंडगार आणि स्वच्छ पाणी नियमित पुरविले पाहिजे. जेणेकरुन त्यांचा शरीरातील द्रव संतुलन टिकून राहील आणि उष्णतेमुळे होणाऱ्या ताणावाचा परिणाम अंडी उत्पादनावर होणार नाही. याशिवाय अंडी टिकाऊ आणि दर्जेदार राहण्यासाठी आहारात आवश्यक प्रमाणात कॅल्शिअम आणि मिनरल्स असणं गरजेचं आहे.

कॅल्शिअमच्य कमतरतेमुळे अंड्यांची टरफले पातळ आणि कमजोर होतात, त्यामुळे अंडी सहज फुटतात. हे टाळण्यासाठी कोंबड्यांच्या आहारात शिंपल्यांचा चुरा, चुनखडी, डोलोमाइट किंवा तयार कल्शियम सप्लिमेंटस् यांचा समावेश करावा. तसेच मिनरल्ससाठी सेंद्रिय पदार्थ आणि संतुलित खाद्य देणे आवश्यक आहे. जेणेकरुन अंडी सशक्त आणि पोषक तत्वांनी समृद्ध राहतील. तापमान नियंत्रण आणि योग्य आहार व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय ठेवून कोंबड्याचे आरोग्य सुधारता येते. त्यामुळे अंडी उत्पादनातील सातत्य टिकवता येते.

मांसल म्हणजेच ब्रॉयलर कोंबड्यांच्या वजनवाढीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेडमधील नियंत्रित तापमान अत्यंत महत्वाचे आहे. कोंबड्यांच्या शरीरामध्ये तयार होणारे तापमान आणि शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा याचे संतुलन असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तापमान वाढले की वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं.

उष्माघातामुळे कोंबड्यांमध्ये मरतुकीचंही प्रमाण वाढत. उष्ण वातावरणामुळे उन्हाळ्यात कोंबड्याचे वजन वेगाने घटते. त्यामुळे ऊर्जायुक्त खाद्य आणि थंड पाणी द्यावे. साधारणपने एक पक्षी एक किलो खाद्यामागे दोन लिटर पाणी पितात. खाद्य आणि पाणी यांचे प्रमाण १:२ असावे. तसंच शेडमध्ये कोंबड्यांची जास्त गर्दी टाळावी, जेणेकरुन त्यांना पुरेशी जागा मिळेल आणि शेडमध्ये उष्णता निर्माण होणार नाही. अशाप्रकारे कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल केल्यास अंडी आणि मांस उत्पादनात सातत्य ठेवता येईलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT