Solapur News : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील (क्लस्टर) शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींच्या मानधनासाठी जिल्ह्याला एक कोटी ८८ लाख ९२ हजारांचा निधी मिळाला आहे. लवकरच त्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा करण्यात येणार आहे..निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे, शेतावर तयार केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे, बाहेरून निविष्ठा खरेदीवरील अवलंबित्व कमी करणे व त्यावरील खर्च कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, गो पशुधन एकात्मिक कृषी पद्धतीचा अवलंब करणे, नैसर्गिक शेतीतील अनुभवाच्या आधारे नैसर्गिक शेतीच्या स्थानिक पद्धती विकसित करणे, .Natural Farming : शेतकऱ्यांनी गिरवले नैसर्गिक शेतीचे धडे .रसायनमुक्त शेतमालासाठी एक राष्ट्रीय ब्रँड तयार करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. त्यासाठी जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील शेतकऱ्यांना प्रतिएकर प्रत्येकी चार हजारांचा प्रोत्साहन भत्ता तर प्रतिगट दोन कृषी सखींना दरमहा प्रत्येकी पाच हजारांचे मानधन दिले जाते. त्यासोबतच त्यासाठी खरेदी केलेल्या मोबाईलचा मोबदलाही दिला जातो..या योजनेस एप्रिलमध्ये राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींना मानधन मिळाले नव्हते. यासाठी जिल्ह्याला एक कोटी ८८ लाख ९२ हजारांचा निधी मिळाला आहे. त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेने (आत्मा) दिली..Natural Farming Mission : सोलापूर जिल्ह्यातील ११५ गटांना थकीत अनुदान.योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीवर दृष्टिक्षेपउद्दिष्ट- २ हजार ७०० हेक्टरगटांची संख्या- ५४प्रतिगट शेतकरी संख्या - १२५एकूण शेतकऱ्यांची संख्या - ६ हजार ७५०प्रतिशेतकरी प्रोत्साहन भत्ता - ४ हजारएकूण कृषी सखी - १०८कृषी सखींना मानधन - ५ हजारजिल्ह्यासाठी निधी - १ कोटी ८८ लाख ९२ हजार.राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींना मानधन देण्यासाठी जिल्ह्याला एक कोटी ८८ लाख ९२ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. गट व कृषी सखींच्या बँक खात्याची माहिती घेऊन वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी गट स्थापन करुन या योजनेचा लाभ घ्यावा.कांतप्पा खोत, प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.