
Poultry Farming : व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना विविध घातक आजार होतात. यापैकी ई कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रामुख्याने पाण्याद्वारे व खाद्याद्वारे प्रसार होतो. या रोगावर अजून प्रभावी लस आलेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करुनच या रोगावर नियंत्रण मिळवता येत. त्यामुळे या रोगाची लक्षणे ओळखण अत्यंत महत्वाच आहे.
ई कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये रोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. ब्रॉयलर कुक्कुटपालनामध्ये दरवर्षी ई-कोलायच्या प्रादुर्भावामुळे ब्रूडिंग दरम्यान ४० ते ५० टक्के पक्ष्यांची मरतुक होते. या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांसह इमू, बटेर, बदके इत्यादी पक्ष्यांमध्येही आढळून येतो.
कोंबड्यांना ई-कोलाय या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांची भूक मंदावते, अपेक्षित वजन मिळत नाही, वाढ खुंटते यामुळे मांस किंवा अंडी उत्पादनात घट येते.
सुरुवातीला श्वसनासंबंधी लक्षणे दिसून येतात यामुळे रात्रीच्या वेळी श्वासाची घरघर, तोंडाने श्वास घेण ही लक्षणे दिसतात. यासाठी कोंबड्यांच रात्रीच्या शांतवेळी निरीक्षण कराव.
आजारी कोंबड्यांची पिसे विस्कटलेली दिसतात. कोंबड्या शेडमध्ये कोपऱ्यात मलूल होऊन बसतात. कोंबड्यांना पांढरी, पातळ, रक्तमिश्रीत हगवण होते. अचानक मरतुक होते. बऱ्याच वेळा ५० टक्क्यांपर्यंत मरतुक पोहोचते. या आजारावर प्रभवी लस किंवा उपचार नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार करुनच या रोगावर नियंत्रण मिळवता येतं. या रोगावर
प्रतिबंधात्मक उपाय करताना
हवेतील अचानकपणे होणाऱ्या मोठ्या बदलांपासून पक्ष्यांच संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी लहान पिल्लांच ब्रूडिंग व्यवस्थापन काटेकोरपणे कराव. कोंबड्यांच शेड हवेशीर राहील याकडे लक्ष द्याव. प्रामुख्याने उन्हाळ्यातये शेडमधील वातावरण शुष्क किंवा कोरड असत.
अशावेळी शेडमध्ये पंखे लावले जातात. त्यामुळे शेडमधील घाण धुराळा हवेत पसरतो. त्यासाठी शेड कायम स्वच्छ ठेवाव. गुठळीयुक्त खाद्यामधून म्हणजेच पॅलेट फीड मधून या रोगाचा प्रसार कमी प्रमाणामध्ये होतो असे आढळून आले आहे.
उंदराच्या विष्ठेमधून रोगकारक जंतूंचा प्रसार जास्त वेगाने होो. त्यासाठी शेडमध्ये उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उंदरांच्या लेंड्या खाद्यामधून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने अंडी उबवणूक केंद्रामधूनच होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगल्या अंडी उबवण केंद्रातील पक्ष्यांची निवड करावी.
रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पहिले सात दिवस पिल्लांना प्रतिजैविकांच्या मात्रा द्याव्यात. पाण्याद्वारे रोगप्रसार टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण कराव. प्रयोगशाळेतून किमान २ वेळा पाण्याची तपासणी करावी. कोंबड्यांना शक्यतो बोअरवेलच पाणी द्याव. अशा प्रकार्या उपाययोजना केल्यास कोंबड्यांतील जिवाणू पासून होणारे आजार रोखता येतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.