Hingoli News : सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) कृषी उत्पन्न बाजार समितीचे विलीनीकरण हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आले. त्यामुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ संपुष्टात आले. एकत्रीकरणानंतर स्थापन हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नियुक्त करण्यात आले आहे. .त्यात मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांची तर सदस्य म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय अधीक्षक बी. डी. पठाडे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय मंडळाने शुक्रवारी (ता. ५) पदभार स्वीकारला आहे..Mumbai APMC : मुंबई बाजार समितीमध्ये साचले कचऱ्याचे ढीग .हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना २२ जून १९३३ रोजी झालेली आहे. तर कळमनुरी बाजार समितीचे विभाजन होऊन ६ मे २००८ रोजी सिरसम बुद्रुक (ता. हिंगोली) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. सिरसम बाजार समितीवर स्थापणे पासून शासकीय मंडळ कार्यरत होते. बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे बाजार समितीची निवडणूक घेता आलेली नाही. .सिरसम बाजार समिती स्थापनेनंतर मूळ उद्देशापर्यंत पोहोचू शकली नाही. शासनाने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या योजनामुळे उत्पन्न कमी असल्यामुळे राबवू शकली नाही. शेतकऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरली आहे. .त्यामुळे सिरसम बाजार समिती व हिंगोली बाजार समितीचे एकत्रीकरण करून नव्याने हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्याची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सध्याच्या या दोन बाजार समित्यांतील मुख्य बाजार व उपबाजारांचे अस्तित्व संपुष्टात येईल. .Katol APMC : काटोल बाजार समिती उभारणार शेतकरी संकुल.एकत्रिकरणानंतर सिरसम बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५६ गावे व हिंगोली बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२० गावे मिळून हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांची संख्या १७६ एवढी झाली आहे.सिरसम बाजार समितीची ५ एकर असून विलीनीकरणानंतर हिंगोली बाजार समितीच्या मालमत्तेत भर पडेल. सिरसम बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे समावेशनचा प्रश्न उद्भवत नाही..परंतु हिंगोली बाजार समितीच्या कर्मचारी संख्येत वाढ होऊन २५ पदे होतील. एकत्रीकरणामुळे सिरसम बाजार समितीचे प्रशासक पद, हिंगोली बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य यांनी धारण केलेली पदे नामंजूर झाल्यामुळे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.