Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : गडचिरोली जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव

लम्पी स्कीन आजाराने अखेर गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

गडचिरोली : ‘‘लम्पी स्कीन (lumpy skin) आजाराने अखेर गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र पशुपालकांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले.

गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील पशुधनामध्ये पहिल्यांदाच लम्पी स्कीन आजारसदृश लक्षणे निदर्शनास आली आहेत. या बाधित जनावरांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शिवणी हे गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याच्या ठिकाणापासून ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सतर्कता क्षेत्रात कनेरी, पुलखल, मुडझा (बु.), मुडझा (तु.), वाकडी, डोंगरगाव (बु.), डोंगरगाव (तु.), हिरापूर चक व कृपाळा ही गावे समाविष्ट आहेत. या गावांत एकूण लसीकरण ४३१० इतके झाले आहे. उर्वरित जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मिणा यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ लाख ३० हजार लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत ४ लाख ४ हजार ४४६ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

...ही आढळतात लक्षणे

या आजारात पशूंना ताप येणे, पूर्ण शरीरावर १०-१५ सेंमी व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होणे, चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भूक कमी होणे, वजन कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे, डोळ्यातील व्रणामुळे दृष्टी बाधित होणे, काही वेळा फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह होणे, पायावर सूज येऊन लंगडणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे, अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आठवड्यात बरी होतात. त्यामुळे वेळीच उपचार करून घ्यावा, असे आवाहन मिणा यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT