Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Disease : शेळी, मेंढीमधील आंत्रविषार

टीम ॲग्रोवन

डॉ. सी. व्ही. धांडोरे, डॉ. व्ही. आर. वाले

आंत्रविषार आजार (Enterotoxemia Disease) क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स जिवाणूमुळे होतो. हा आजार सर्व वयोगटातील शेळ्या (Goat Disease), मेंढ्यांना होऊ शकतो. आंत्रविषार नियंत्रणासाठी लसीकरण करून घ्यावे. तीन महिन्यांवरील कोकरे आणि करडांना लस द्यावी. हा आजार सर्व वयोगटांतील मेंढ्या आणि शेळ्यांना (एका आठवड्यापासून ते मोठ्या वयापर्यंत) होऊ शकतो.

आजाराची लक्षणे :

१) कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊन कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसून येते. हे कोवळे गवत शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंत्रविषार होतो.

२) लहान कोकरांना, करडांना जास्त दूध पाजणे.

३) अतिकर्बयुक्त पदार्थ म्हणजे मका, गहू, ज्वारी इ. जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास.

४) करडे, कोकरे निस्तेज दिसतात, दूध पीत नाहीत, सुस्त, एका जागेवर बसून राहतात.

५) पातळ हिरव्या रंगाची संडास होते. तोंडास फेस येतो. बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात. चक्कर येते.

६) मोठ्या शेळ्या-मेंढ्यांच्या तोंडातून फेस येणे, लाल येणे, अडखळत चालणे, दात खाणे, तोल जाणे, गोल फिरणे, श्‍वासोच्छ्वासास त्रास होणे आणि शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात.

७) कोकरू आणि करडामध्ये आंत्रविषार आजाराची बाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजाराची लक्षणे लक्षात येईपर्यंत बाधित शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू होतो.

८) आंत्रविषारामुळे होणारे मृत्यू सहसा अचानक होतात. प्रादुर्भाव झाल्यापासून १२ तासांत करडांचा मृत्यू होतो. कोकरू सुस्तपणे एका ठिकाणी बसून राहतात. कोकरांमध्ये हातपाय ताठ होणे, आक्षेपार्ह हालचाली, मेंदूशी संबंधित लक्षणे, अतिसार, करडे दूध पिणे बंद करतात.

९) या आजारामध्ये साधारणतः मृत्यूचे प्रमाण १० ते ४० टक्क्यांपर्यंत आढळते.

आजाराचे कारण ः

१) आंत्रविषार आजाराचे कारण म्हणजे क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स टाइप सी किंवा टाइप डी या जिवाणूद्वारे तयार केलेल्या विषांद्वारे होतो. बहुतेक शेळ्या-मेंढ्यामध्ये आतड्यात क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स हा जिवाणू कमी प्रमाणात असतो.

२) मोठ्या प्रमाणात आणि उच्च दर्जाच्या आहारामुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत, जिवाणू वेगाने वाढून एक शक्तिशाली विष तयार करतात. हे विष आतड्याच्या आतून शोषले जातात आणि काही तासांत शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू होतो.

३) आहारामध्ये अचानक बदल होणे. खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट देणे. स्टार्च आणि शर्करा नसलेला आहार देणे. अनियमित आहार देणे. आहाराचे प्रमाण खूप वेगाने वाढवणे.

४) प्राण्यामध्ये परजीवी प्रमाण असणे. आतड्यात मोठ्या प्रमाणात न पचलेले किंवा अंशतः पचलेले अन्नामुळे आतड्यांमध्ये विष तयार होते. नैसर्गिक रोग प्रतिकारशक्तीचा अभाव असणे.

आजाराचे निदान ः

१) जर मृत्यूनंतर तत्काळ किंवा त्वरित शवविच्छेदन केले गेले, तर काही बदल लक्षात येऊ शकतात, विशेषत: जनावरांचा अचानक मृत्यू झाल्यास तेव्हा त्यात सामान्यतः फुफ्फुसातील रक्तसंचय आणि द्रवपदार्थ आणि जिलेटिनस सामग्रीच्या (फायब्रिन) गुठळ्या असलेल्या हृदयाच्या थैलीमध्ये (पेरीकार्डियल सॅक) द्रव पदार्थात

वाढ झालेली असते. हृदयाच्या बाहेरील आणि आतील स्नायूंच्या भिंतींवर रेषा असलेल्या स्पष्ट पडद्याच्या खाली लहान रक्तस्राव आणि रक्त स्प्लॅश दिसून येतो. मूत्रपिंडाच्या उती द्रवाने भरतात, वेगाने खराब होतात.

उपचार:

१) अल्प मुदतीचा आजार असल्यामुळे प्रभावी उपचारपद्धती नाही. पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत, त्यामुळे पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते. जिवाणूंची वाढ होणे थांबते.

२) कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये.

३) अतिकर्बयुक्त पदार्थ (ज्वारी, मका इ.) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.

४) गाभण शेळ्या-मेंढ्यांना पशुतज्ज्ञांकडून आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे. तीन महिन्यांवरील कोकरे आणि करडांना लस द्यावी.

------------------------------

संपर्क ः

डॉ. सी. व्ही.धांडोरे, ९३७३५४८४९४

(पशुधन विकास अधिकारी, पशू वैद्यकीय दवाखाना, चोपडी, जि. सोलापूर)

डॉ. व्ही. आर. वाले, ८९९९१२८२५२

(पशुसंवर्धन विभाग, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT