Kokan kanyal Goat
Kokan kanyal GoatAgrowon

Goat Farming : कोकण कन्याळ शेळीची वैशिष्ट्ये माहीत आहेत का ?

पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी ५० किलो, तर शेळीचे (Goat) वजन ३२ किलोपर्यंत भरते. ही शेळी ११ व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यांत पहिले वेत देते.
Published on

कोकण कन्याळ जातीची शेळी (Konkan Kanyal Goat) महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आणि जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात आढळून येते.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (Dr. Balasaheb Sawant Kokan Krushi Vidyapeeth) विकसित केली आहे.

चेहरा चपटा व लांबट असतो व पाय लांब असतात. ही जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे.
एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे २५ किलो आणि मादीचे २१ किलो वजन भरते.

कन्याळ या शेळयांचा रंग काळा असतो. शेळयांच्या तोंडावर आणि कानावर पांढऱ्या रंगाच्या पट्टया असतात.

पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी ५० किलो, तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते.
ही शेळी ११ व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यांत पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते.

दोन वेतातील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. दुधाचा कालावधी ९७ दिवसांचा आहे. भाकड काळ हा ८४ दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com