Cow Rearing  Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Rearing : गोठा स्वच्छता, निर्जंतुकीकरणावर भर

Indian Agriculture : मुरूड, (ता. जि. लातूर) येथे अण्णासाहेब नागटिळक यांची साडेतीन एकर जमीन आहे. शेतीचे क्षेत्र कमी असल्यामुळे अण्णासाहेब खासगी नोकरी करत होते. मात्र, त्यातून मिळणाऱ्या पैशातून घरखर्च भागत नव्हता.

Team Agrowon

Farmer Management : शेतकरी नियोजन

गोपालन

शेतकरी : अण्णासाहेब दत्तोबा नागटिळक

गाव : मुरूड, ता. जि. लातूर

एकूण शेती : साडेतीन एकर

एकूण जनावरे : १३ (गायी ७, वासरे ४, कालवड १, बैल १)

मुरूड, (ता. जि. लातूर) येथे अण्णासाहेब नागटिळक यांची साडेतीन एकर जमीन आहे. शेतीचे क्षेत्र कमी असल्यामुळे अण्णासाहेब खासगी नोकरी करत होते. मात्र, त्यातून मिळणाऱ्या पैशातून घरखर्च भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी दहा वर्षांपूर्वी दोन संकरित गायी घेऊन दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. सध्या त्यांच्याकडे सात गायींसह एकूण १२ जनावरे आहेत. गोठ्यातून दररोज ६५ ते ७० लिटर दूध उत्पादन मिळते आहे. दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती झाल्यानंतर जनावरांसाठी उत्तम शेड उभारत अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर त्यांनी भर दिला. पत्नी सौ. मनिषा यांची शेती व दुग्ध व्यवसायाच्या कामांमध्ये अण्णासाहेब यांना मदत मिळते. दुग्ध व्यवसायातील मिळत गेलेल्या उत्पन्नातून त्यांनी कर्ज फेडले. नवीन घर बांधले. शेतात विहीर खोदली,असे अण्णासाहेब नागटिळक सांगतात.

आतापर्यंत गोठ्यामध्ये पैदास झालेल्या तीन कालवडी व तीन म्हशींची विक्री करण्यात आली आहे. आगामी काळात सर्वोच्च गुणवत्तेच्या आणखी गाईची खरेदी करत व्यवसायाचा विस्तार करण्याचा मानस आहे. तसेच दूध काढणीसाठी मशिन खरेदी करणार आहे, असे अण्णासाहेब सांगतात.

व्यवस्थापनातील बाबी

जनावरांसाठी मुक्त संचार आणि बंदिस्त अशा दोन्ही स्वरूपाच्या गोठ्याची उभारणी केली आहे. मात्र गाईंचे मुख्यतः मुक्त गोठ्यात संगोपन केले जाते.

जनावरांसाठी १४ फूट बाय ४५ फूट आकाराची दोन पत्र्याची शेड उभारली आहेत. शिवाय १०० फूट बाय ५० फूट आकाराचा मुक्त संचार गोठा तयार केला आहे.

चारा खाण्यासाठी सिमेंटची गव्हाण बांधली आहे.

रोज सकाळी पाच वाजता शेडमधील कामांस सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्यातील शेण मागे ओढून गव्हाणीची स्वच्छता केली जाते.

मुक्त गोठ्यातील गाई दूध काढण्यासाठी गोठ्यात आणून दावणीला बांधल्या जातात. तेथे चारा आणि खुराक दिला जातो. दूध काढल्यानंतर पुन्हा मुक्त गोठ्यात सोडले जाते.

सर्व गाईंचे दूध हाताने काढण्यावर भर दिला जातो. गोठ्यातून दररोज सकाळी व सायंकाळी काढलेल्या दुधाची खासगी डेअरीला विक्री केली जाते. गायींपासून दररोज ६५ ते ७० लिटर दूध उत्पादन मिळते.

गोठ्यातून जमा केलेले शेण खड्ड्यात टाकले जाते. दरवर्षी गोठ्यातून सुमारे २१ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यापैकी काही शेणखत स्वतःच्या शेतामध्ये आणि उर्वरित शेणखताची प्रति ट्रॉली साडेचार हजार रुपये दराने विक्री केली जाते.

आरोग्य व्यवस्थापन

बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत मुक्त गोठ्यामध्ये गायी आजारी पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. गोठ्यातील जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जातो. तसेच नियमितपणे खुराकामध्ये हळद टाकून दिली जाते. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जनावरांचे नियमितपणे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. त्यामुळे जनावरांचे विविध आजारांपासून संरक्षण होते. दररोज गोठ्यातील प्रत्येक जनावराचे निरिक्षण केले जाते. दूध काढताना एखादे जनावर काही वेगळी लक्षणे दाखवत असेल तर अशा जनावरास त्वरित पशुवैद्यकांना दाखविले जाते. त्यानुसार पुढील औषधोपचार केले जातात, असे अण्णासाहेब सांगतात.

चारा, पाणी व्यवस्थापन

जनावरे निरोगी राहून दूध उत्पादन टिकून राहण्यासाठी चारा, आरोग्य आणि पिण्याचे पाणी या बाबींचे काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला जातो.

गोठ्यातील जनावरांना अंघोळ घालून नियमित स्वच्छता केली जाते. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

हिरवा चारा व सुका चारा यांची कुट्टी करून दोन्ही एकत्रित जनावरांना दिले जाते. सोबत दररोज घास, उसाचे वाडे, वैरण व गोळीपेंड दिली जाते. याशिवाय सकाळी व सायंकाळी पशुखाद्य दिले जाते.

जनावरांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे तीन हजार लिटर क्षमतेचा हौद बांधला. हौदाची वेळोवेळी स्वच्छता करून जनावरांना शुद्ध पाण्याची उपलब्धता केली जाते.

प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रामध्ये संकरित नेपिअर गवताची लागवड केली आहे. त्यामुळे जनावरांना पुरेसा हिरवा चारा उपलब्ध होतो.

अण्णासाहेब नागटिळक : ९६०४८१२४९१

(शब्दांकन : विकास गाढवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT