Soil Conservation: जमिनीचे सुपोषण ही काळाची गरज असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले..केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने १ ते ३० जून २०२६ या कालावधीत संपूर्ण देशात ‘शेती वाचवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत केंद्रीय संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्या मार्फत पूर्ण महिनाभर विविध कृषी विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे उद्घाटन शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी डॉ. इंद्र मणी यांनी आभासी माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले..Soil Health Management: जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे.याप्रसंगी डॉ.राकेश अहिरे, डॉ. सूर्यकांत पवार, उप विभागीय कृषी अधिकारी श्रीमती.अश्विनी पठारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून तसेच केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर यांच्यासह शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे.ते म्हणाले, की शेतीमध्ये अतिरिक्त रसायनांचा वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावत चालले आहे. विविध जैविक निविष्ठा, हिरवळीचे खते जैविक कीटक व बुरशी नाशके, जैविक खते यांचा नियमितपणे वापर करून रासायनिक खतांचा वापर आपण कमी करू शकतो आणि त्यामुळे जमिनीचे सुपोषण करून मातीचे आरोग्य आपण सुधारू शकतो. कृषी विद्यापीठाच्या सर्वच कार्यालयामार्फत पुढील एक महिना शेती वाचवा अभियान आयोजित करण्यात येत असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे.यावेळी डॉ. अहिरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कापूस, मकाया पिकामध्ये होत असलेल्या अति रसायनाचा वापर यावर प्रकाश टाकला व सर्वच पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर हा किमान २५ टक्के कमी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले..यावेळी डॉ. पवार यांनी कापूस, तूर पिकामधील सुधारित लागवड तंत्रज्ञान, कमी कालावधीच्या वाणांची निवड, बीजप्रक्रिया, आंतरपीक पद्धती, जैविक निविष्ठांचे महत्व, बेडवरील लागवड, बीबीएफ लागवड तंत्रज्ञान आणि एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले..प्रास्ताविक डॉ. पाटगावकर यांनी केले. डॉ.बस्वराज पिसुरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.संजुला भावर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवा काजळे,जयदेव सिंगल,जयदीप बनसोडे, किशोर शेरे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.