Farmers Concerns: शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेसच्या वतीने मुदखेड तहसीलवर मंगळवारी (ता. २) गाढव मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा राज्य प्रवक्ते व युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला..प्रलंबित पीकविमा रक्कम तातडीने वितरित करावी, बारड मंडळातील चुकीच्या पीक कापणी प्रयोगांची चौकशी करावी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना भरपाई द्यावी, डिझेल व गॅस टंचाई दूर करावी, वाढत्या महागाईवर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या..Congress Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसची आज धाराशिवला संघर्ष न्याययात्रा.या मोर्चात खासदार रवींद्र पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्याध्यक्ष तिरुपती कोंढेकर, शेतकरी नेते भगवान पाटील मनुरकर, पिंटू पाटील वासरीकर, माजी नगरसेवक गोविंद गोपणपल्ले, गंगाधर डांगे, करीमखासाब, .Congress Protest: इंधन दरवाढ, कांदादरप्रश्नी काँग्रेसचा ‘रास्ता रोको’.नगरसेवक तथा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, नगरसेवक अविनाश चौदंते, खदिर भाई, संजय बोकेफोड, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गिरीश कोत्तावार, सूर्यकांत चौदंते, सुभाष चौदंते, शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष वेदांत शेवटे, शेख गौस भाई फुलवाले, खदिर खुरेशी, मोहन भाई फुलवाले, श्याम शिंदे, .केशव शिंदे, विश्वनाथ नाथ, शिवाजी वडजे, माणिक मुंगल, संभाजी गाढे, गणेश ढगे, यदुराज गाढे, संभाजी पवार, प्रशांत मुंगल, नागोराव भांगे, हनुमान लखे, माधव अक्केमवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.