Goat Health Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळ्यांच्या निरोगी वाढीसाठी प्रयत्न

Livestock Management : रूड (ता. लातूर) येथील भोकुडसुंबा शिवारात साजीद राजमहमद सय्यद यांच्या कुटुंबीयांची साडेतीन एकर जमीन आहे. सय्यद कुटुंबांचा मुरूड बस स्थानक परिसरात पान विक्रीचा मूळ व्यवसाय आहे.

विकास गाढवे

Animal husbandry :

शेतकरी नियोजन

शेळीपालन

शेतकरी : साजीद राजमहमद सय्यद

गाव : मुरूड, ता. जि. लातूर

एकूण शेळ्या : ३० शेळी, १५ बोकड.

रूड (ता. लातूर) येथील भोकुडसुंबा शिवारात साजीद राजमहमद सय्यद यांच्या कुटुंबीयांची साडेतीन एकर जमीन आहे. सय्यद कुटुंबांचा मुरूड बस स्थानक परिसरात पान विक्रीचा मूळ व्यवसाय आहे. वडिलोपार्जित शेतीमुळे कुटुंबांतील सर्वांनाच शेती व शेतीकामांची आवड आहे. साजीद सय्यद यांनी आधुनिक शेतीची कास धरत बंदिस्त शेळीपालन व्यवसायाची जोड दिली आहे. सध्या त्यांच्याकडे ३० शेळी, १५ बोकड आणि लहान पिले आहेत. २०१५ मध्ये व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र व पशू संवर्धन विभागाकडून शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. यशस्वी शेळीपालकांच्या शेडला भेटी देत व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. शेळ्यांच्या निकोप वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.

व्यवस्थापनातील बाबी

बंदिस्त शेळीपालनासाठी तीन शेड उभारले आहेत. शेडचा आकार अनुक्रमे ६० बाय ३० फूट, २६ बाय ५० फूट व २२ बाय ५० फूट असा आहे. पहिल्या शेडमध्ये मोठ्या शेळ्या, दुसऱ्या शेडमध्ये बकरे (बोकड) व तिसऱ्या शेडमध्ये लहान पिले व पाटीचे संगोपन केले जाते.

शेळ्यांना हिरवा चारा व्यवस्थित खाता यावा, यासाठी प्रत्येक शेडच्या मधोमध उंच लोखंडी गव्हाण तयार केली आहे.

सकाळी सहा वाजता शेडमधील कामांना सुरवात होते. प्रथम शेडमधील लेंड्या बाजूला करून शेडची स्वच्छता केली जाते.

सकाळी आठ वाजता शेळ्यांना खुराक दिला जातो. त्यानंतर सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता हिरवा चारा दिला जातो.

दुपारी दोन वाजता केवळ पिलांना हिरवा चारा दिला जातो.

आरोग्य व्यवस्थापन

मोठ्या शेळ्यांना तीन महिन्यांनी, तर छोट्या पिलांना दर महिन्याला जंतनाशकाची मात्रा दिली जाते. नियमित जंतनाशक मात्रा देण्यामुळे शेळ्यांची वाढ होऊन अपेक्षित वजन मिळविणे शक्य होते. त्यासाठी नियमित जंतनाशक करण्यावर भर दिला जातो. वर्षभर नियमित विविध प्रकारचे लसीकरण शेळ्यांना केले जाते.

चारा, पाणी व्यवस्थापन

शेळी व बकऱ्यांच्या निकोप व निरोगी वाढीसाठी हिरवा चाऱ्यामध्ये विविध वनस्पतींचा पाला, गवत, घास यांचा वापर केला जातो.

शेळ्यांना वर्षभर पुरेल या पद्धतीने हिरव्या चाऱ्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी एक एकरामध्ये सुबाभूळ, शेवरीची लागवड केली आहे.

एक एकरावर तुती लागवड केली आहे. त्यातूनही शेळ्यांना हिरवा पोषक चारा उपलब्ध होतो.

शेताच्या बांधावर ३० ते ४० प्रकारच्या जंगली वनस्पतींची लागवड केली आहे.

शेडनेटमध्येही मेथी घास, दशरथ घास आदी चारा पिकांचे उत्पादन घेतले जाते.

शेळ्यांना दररोज खुराक दिला जातो. यात मका, गहू, सोयाबीन भुस्सा, खनिज मिश्रण व मीठ यांचा समावेश असतो.

उत्पादन व विक्री

अन्य शेळ्यांप्रमाणे या शेळ्यांच्या दुधाचा वास येत नाही. यामुळे कुटुंबात खाण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. आयुर्वेदिक म्हणून अनेकांकडून शेळीच्या दुधाला विशेष मागणी असते. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळते.

बकऱ्यांची जागेवरूनच विक्री होते. बाजारात जाण्याची गरज पडत नाही. साधारणपणे ६ महिने वयाच्या बोकडाची विक्री केली जाते. असे वर्षभरात साधारण ४० बोकड आणि २० शेळ्यांची विक्री केली जाते.

येत्या काळात पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून व बँकेच्या अर्थसाह्यातून शेळ्यांच्या संख्येत वाढ करण्याचे नियोजित आहे.

शेळीपालनातून दरवर्षी सुमारे ५ ट्रॉली लेंडीखत उपलब्ध होते. संपूर्ण खताची स्वतःच्या शेतातील पिकांमध्ये वापर केला जातो. उर्वरित लेंडीखताची विक्री केली जाते. त्यामुळे पीक उत्पादनात भरीव वाढ होत आहे.

साजीद सय्यद ९९६०५४९७९९

(शब्दांकन : विकास गाढवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watershed Development Management : शाश्वत विकासात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व

PM Modi On Dhan : सत्ता दिल्यास धानाचा एमएसपी ७८० रूपयांनी वाढवू; पंतप्रधान मोदी यांचे झारखंडवासियांना आश्वासन

Winter Season : हिवाळी हंगाम आणि थंडीस सुरवात

JPC On Waqf Board : भाजपचे आरोप आणि तणावानंतर जेपीसीची कर्नाटक वल्फ बोर्ड प्रकरणात उडी; घेणार तक्रारदार शेतकऱ्यांची भेट

Vaccination Animals : परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जनावरांचे लसीकरण सक्तीचे, पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT