Mulberry Cultivation : मराठवाड्यात १० हजार एकरांवर तुती लागवड

Mulberry Farming : निसर्ग कायम प्रतिकूल राहणाऱ्या मराठवाड्यात उत्पन्नाच्या दृष्टीने आश्वासक असलेल्या रेशीम उद्योगासाठीच्या तुती लागवडीचे क्षेत्र १० हजार १६४ एकरांवर पोहोचले आहे.
Mulberry Cultivation
Mulberry CultivationAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : निसर्ग कायम प्रतिकूल राहणाऱ्या मराठवाड्यात उत्पन्नाच्या दृष्टीने आश्वासक असलेल्या रेशीम उद्योगासाठीच्या तुती लागवडीचे क्षेत्र १० हजार १६४ एकरांवर पोहोचले आहे. यामध्ये जुन्या व नव्या तुती लागवडीचा समावेश असून रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही ९,७६३ वर पोहोचली आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशन उद्योग बऱ्यापैकी उत्पन्नाचे मुख्य स्रोत बनला आहे. यंदा मात्र रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या तुतीची लागवड पावसाअभावी थोडी रखडतच सुरू झाली. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ दरम्यान जुनी नवी मिळून दहा हजार १६४ एकरवर तुती लागवड झाली. त्यामध्ये जुन्या ८,८८३ शेतकऱ्यांच्या ९,२७२ एकरसह नव्याने लागवड झालेल्या ८८० शेतकऱ्यांच्या ८९२ एकर क्षेत्राचा समावेश आहे. यंदा नवीन तुती लागवडीसाठी मराठवाड्याला ८१९४ एकरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी ७५० शेतकऱ्यांनी ७५० एकरवर नव्याने तुती लागवड केली होती.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : बुलडाणा जिल्ह्यात ६२७ एकरांवर तुतीची लागवड

७०८ एकरांवरील तुती बाद

मराठवाड्यातील आठ पैकी सहा जिल्ह्यांतील ६८६ शेतकऱ्यांची ७०८ एकरांवरील तुती बाद झाली आहे. तुती बाद होण्यामागे निसर्गाच्या प्रतिकृतीसह इतरही अनेक कारणांचा समावेश आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यांतील एकाही शेतकऱ्याची तुती बाद झाली नाही हे विशेष.

यंत्रणेचे हवे सक्षमीकरण

नागपूर स्थित रेशीम संचलनालयाच्या माध्यमातून राज्यातील रेशीमचा गाडा हाकला जातो. परंतु रेशीम संचालनालयाला यंत्रणेची कमतरता आहे. मोजक्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हाताने प्रत्येक जिल्ह्यातील रेशीमचा गाडा हाकला जातो. त्यामुळे या शेती उद्योगात विस्ताराची संधी असूनही सक्षम यंत्रणेअभावी रेशीम उद्योग विस्तारावर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. शेतकरीच एकमेकांच्या संपर्कातून बहुअंशी रेशीम उद्योग करत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना आश्वासक उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : तुती लागवडीच्या सुधारित पद्धती

बीड रेशीमचे ‘हब’

मराठवाड्यातील एकूण तुती क्षेत्राच्या जवळपास निम्मी लागवड एकट्या बीड जिल्ह्यात आहे. मराठवाड्यातील एकूण तुतीचे क्षेत्र १० हजार १६४ एकर असताना त्यापैकी ४,९२८ एकर क्षेत्र बीडमध्ये आहे. शिवाय रेशीम उद्योगात सहभागी असलेल्या ९७६३ शेतकऱ्यांपैकी ४,६२३ शेतकरी एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील रेशीम उद्योगाचे ‘हब’ म्हणून बीड जिल्हा पुढे येतो आहे.

जिल्हानिहाय जुनी, तुती लागवड क्षेत्र (एकरमध्ये) शेतकरी संख्या

जिल्हा शेतकरी क्षेत्र

छ.संभाजीनगर ६९४ ७०५.७५

जालना ८३२ ८५०

परभणी ३८७ ४२४

हिंगोली २७३ २७८

नांदेड ३०२ ३२०

लातूर ४४७ ४५८.२५

धाराशिव १५०५ १४८८

बीड ४४४३ ४७४८

जिल्हानिहाय नवीन तुती लागवड (एकरमध्ये)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

छ.संभाजीनगर १५५ १५९

जालना ८५ ८५

परभणी ८० ८०

हिंगोली ६० ६०

नांदेड २१५ २२२

लातूर ४० ४०

धाराशिव ६५ ६६

बीड १८० १८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com