Bhandaara News: भंडारा जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच पवनी येथे सावकार दांपत्याच्या दादागिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. जास्त व्याजदराने पैसे देऊन कर्जदारांकडून जबरदस्तीने वसुली केल्याप्रकरणी पवनी पोलिसांनी संदेश खोब्रागडे (४०) व रेखा खोब्रागडे (३२) या दांपत्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत. या घटनेमुळे परिसरात अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे..पवनी येथील रामपुरी वॉर्डमधील रहिवासी विशाखा नागपुरे (४४) यांनी पाच वर्षांपूर्वी रेखा खोब्रागडे यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यवहारावर १० टक्के व्याजदर ठरविण्यात आला होता. कर्ज घेतल्यानंतर नागपुरे यांनी आतापर्यंत व्याजासह सुमारे १३ लाख ८० हजार रुपये परत केले. तरीही सावकार दांपत्याकडून उर्वरित रक्कम मागण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे..Illegal Money Lending : अवैध सावकारीवर कारवाईचा धडाका.तक्रारीनुसार, रक्कम परत करूनही खोब्रागडे दांपत्याने नागपुरे यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली तसेच घरातील वस्तू फेकून देत धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पवनी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२ व ३५१(२) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायदा २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रीतम येवले या प्रकरणाचा तपास करीत आहेत..Money Lending License : अवघ्या ५०० रुपयांत मिळतो सावकारी परवाना .दरम्यान, याच दांपत्याविरोधात दुसरे प्रकरणही समोर आले आहे. पवनी येथील गणेश वार्ड निवासी शैलेंद्र कुर्वे (४०) यांनी संदेश खोब्रागडे यांच्याकडून ३ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यवहारावरही १० टक्के व्याज आकारण्यात आले. कुर्वे यांनी आतापर्यंत ३ लाख ४३ हजार रुपये व्याजापोटी दिले. त्यानंतर ही त्यांच्यावर व्याज थकीत दर्शविण्यात आले असा आरोप आहे. तक्रारीनुसार, कर्जाची परतफेड सुरू असतानाही खोब्रागडे यांनी पूर्वी घेतलेला कोरा धनादेश वापरून ३ लाख रुपयांची रक्कम लिहून बँकेत जमा करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आक्षेप घेतल्यावर तक्रारदाराला धमकावण्यात आल्याचा आरोप आहे..या प्रकरणातही पवनी पोलिसांनी सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ३ लाख ३० हजार रुपयांच्या कर्जावर आतापर्यंत ३ लाख ४३ हजार रुपये केवळ व्याजापोटी वसूल करण्यात आले. मूळ रक्कम परत केल्यावरही ती केली नसल्याचे दर्शविण्यात आले..अवैध सावकारीबाबत पोलिसांचे आवाहनजिल्ह्यात कोणीही बेकायदेशीर सावकारी करत असल्यास किंवा जास्त व्याजदराने पैसे देऊन कर्जदारांना धमकावत असल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.