Poultry  Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Industry : कर्नाटक, आंध्र प्रदेशातील कोंबड्यांवर बंदी घालण्याची मागणी

Poultry Business : सध्या महाराष्ट्रात कर्नाटकामधून येणारी कमी भावातील अंडी तसेच आंध्र प्रदेशातून येणाऱ्या कोंबड्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : सध्या महाराष्ट्रात कर्नाटकामधून येणारी कमी भावातील अंडी तसेच आंध्र प्रदेशातून येणाऱ्या कोंबड्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने बाहेरील राज्यातील अंडी व कोंबड्यांवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे

गेल्या काही वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत आहे. कोंबडी खाद्याचे दर १५०० रुपये प्रति ५० किलो पोत्यास द्यावे लागतात. सध्या होलसेल अंड्यांचा भाव बाजारात ५०० रुपये शेकडा आहे. या अंड्यांच्या भावाच्या दरात पोल्ट्रीचा खर्च कसाबसा चालतो.

पोल्ट्री व्यवसायिकांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यातच कर्नाटकातील होसपेट येथील तीनशे रुपये शेकडा या दराने पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला चार लाखांच्यावर स्वस्त दरांनी अंडी व्यापारी आणून विकत आहेत.

परिणामी, महाराष्ट्रातील अंड्यांचे दर घसरत चालले आहेत. त्याचबरोबर त्याचा उठावही व्यापाऱ्याकडून लवकर होत नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सध्या बाजारात महाराष्ट्राच्या पोल्ट्रीतून ७० रुपयांप्रमाणे अंडी न देणारी कोंबडी (कल पक्षी) विकला जात आहे. आंध्र प्रदेशातून पन्नास रुपयांप्रमाणे बाजारात दररोज ३००० च्यावर अशा कोंबड्या आंध्र प्रदेशातून विक्रीस येत आहेत. त्यामुळे कोंबड्यांचे दर ढासळत चालले आहेत.

स्वस्त दराने अंडी व कोंबड्या (कल पक्षी) बाजारात परराज्यांतून घेऊन विकल्या जात असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील २०० च्यावर पोल्ट्री व्यावसायिकांचा धंदा आर्थिकदृष्ट्या धोक्यात आला आहे.

थंडीच्या दिवसातही अंड्याला जेमतेम मागणी होती. अंडी व कोंबड्या विक्री होत असली तरी कर्नाटक व आंध्र प्रदेशातील अंडी व कोंबड्यांच्या आक्रमणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. पोल्ट्री व्यावसायिक कर्जबाजारी होऊ लागले आहेत.

पोल्ट्री व्यवसाय मोडून पडू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यावर आयात होणाऱ्या अंडी व कोंबड्यांवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकातून होत आहे. त्यासंबंधी आठवडाभरता पशुसंवर्धनमंत्री, आयुक्त यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले जाणार आहे.
- नंदकुमार चौधरी, उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा फेडरेशन, महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात

Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा

Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढणार

SCROLL FOR NEXT