Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’बाधित ३० जनावरांच्या मृत्यू

Animal Death : जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांची काळाजी वाढली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या संख्येत दररोज वाढ होत असून लम्पी स्कीनने आतापर्यंत ३० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई १२, संकरित गाय १० व देशी आठ गाईचा समावेश आहे. तर उपचाराने १८६ जनावरे बरी झाली आहेत.

जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांची काळाजी वाढली आहे. जिल्ह्यात एकूण ३८३ जनावरे बाधित झाली असून १८६ जनावरे उपचारादरम्यान बरी झालेली आहेत. ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये खिल्लार बैल १२, संकरित गाय १० व देशी आठ गाईचा संकरित गाईचा समावेश आहे. बाधित जनावरांवर तत्काळ उपचार करण्यात येत असून, लागण झालेल्या जनावरांच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात तीन लाख ४९ हजार ३६५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची टक्केवारी सुमारे ९८ टक्के आहे.

संबंधित ठिकाणी जंतूनाशक फवारणीही करण्यात येत असून, पशुपालकांनी घाबरून न जाता पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT