Lumpy skin disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : कोलझरमध्ये ‘लम्पी स्कीन’ने एक गाय दगावली

Lumpy Skin Disease Outbreak : गेल्या वर्षी जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’च्या संसर्गाचा मोठा फटका बसला.१ हजार ५०० हून अधिक जनावरांना संसर्ग झाला होता.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’चा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोलझर (ता. दोडामार्ग) येथील लक्ष्मण बोंद्रे यांच्या एका गायीचा ‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’च्या संसर्गाचा मोठा फटका बसला.१ हजार ५०० हून अधिक जनावरांना संसर्ग झाला होता. तर ५० हून अधिक जनावरांचा ‘लम्पी स्किन’मुळे मृत्यू झाला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात ९५ टक्के जनावरांना लसीकरण केले होते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘लम्पी स्कीन’चा संसर्ग पूर्णतः थांबला होता. परंतु आता या संसर्गाने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील कोलझर येथे ‘लम्पी स्किन’ने गायीचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा ‘लम्पी स्कीन’चे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने कोलझर पंचक्रोशीत गुरांना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांत लम्पी स्कीन सदृश लक्षणे जनावरांमध्ये आहेत का, हे देखील आता तपासून पाहिले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT