Lumpy Disease Kolhapur : लम्पीमुळे कोल्हापुरातील ४ तालुक्यांत हाहाकार, शासन आणि गोकुळकडून मदतीची अपेक्षा

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, भुदरगड, राधानगरी, गारगोटी, कागल या तालुक्यात लम्पी सारख्या साथ रोगाने धुमाकूळ घातला आहे.
Lumpy Disease Kolhapur
Lumpy Disease Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Lumpy News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, भुदरगड, राधानगरी, गारगोटी, कागल या तालुक्यात लम्पी सारख्या साथ रोगाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान मागच्या सहा महिन्यांत भुदरगड तालुक्यातील ३५० हून अधिक जनावरांना प्राण गमवावा लागला आहे. तर राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावात मागच्या ८ दिवसांपूर्वी ११ जनावरे दगावली होती.

सध्या भुदरगड तालुक्यातील तब्बल ३० ते ३५ गावांतील लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जीवापाड जपलेली जनावरे अचानक दगावत असल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.

दरम्यान जिल्हा आरोग्य विभाग आणि गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी याबाबत उपाययोजना न केल्याचा आरोप दूध उत्पादकांमधून केला जात आहे. गाय, बैल अशा जनावरांच्या कातडीवर फोड येत आहेत. प्रसंगी कातडी सोलून निघते. उपचार करूनही फारसा फरक पडत नाही. परंतु शासनाकडून पुरेशी मदत मिळत नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या आजारात सर्वात जास्त गाय आणि बैलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. डिसेंबर २०२२ मध्ये आलेल्या या आजारात सुमारे २०० जनावरे दगावली होती. काही दिवस या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला होता; मात्र तो पूर्णपणे गेला नव्हता. परंतु पुन्हा याची साथ आल्याने मागच्या महिन्याभरात या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.

Lumpy Disease Kolhapur
Lumpy Skin : लम्पी स्कीनमुळे मृत जनावरांची मिळणार भरपाई

सुमारे ४७० जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या ठिकाणी सुरू असलेले जनावरांचे बाजार व व्यापाऱ्यांकडून होणारी विक्री, यामुळे लम्पी रोग जास्तच फैलावल्याची चर्चा आहे. सुमारे साडेअकरा हजारांहून अधिक गायवर्गीय जनावरे आहेत.

मात्र, जनावरांना पशुवैद्यकीय सेवा देणारी शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. तालुक्यातील अनेक दवाखान्यांत पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्यामुळे दवाखाने ओस पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सेवेचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.

गेली कित्येक वर्षे दूध संघाकडे आम्ही दूध घालतो. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मते मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com