Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccination : लसीकरणातून मिळवले ‘लम्पी स्कीन’वर नियंत्रण

Lumpy Skin Disease : गेल्या वर्षात राज्यात सर्वाधिक वेगाने अकोला जिल्ह्यात लम्पी स्कीन हा रोग जनावरांमध्ये प्रसारीत झाला होता.

Team Agrowon

Akola News : गेल्या वर्षात राज्यात सर्वाधिक वेगाने अकोला जिल्ह्यात लम्पी स्कीन हा रोग जनावरांमध्ये प्रसारीत झाला होता. यंदा मात्र आतापर्यंत एकही जनावर बाधित झालेले नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

मागील वर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान अकोला जिल्ह्यात गावागावांत जनावरे लम्पी स्कीनने बाधित झाली होती. काही जनावरांचा मृत्यूसुद्धा या रोगामुळे ओढावला होता. तेव्हा पशुसंवर्धन विभागाचे मंत्री, सचिव व वरिष्ठ अधिकारी अकोला जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. शासनाने लम्पीसाठी लसीकरणाची मोहीम राबवल्याने साथीवर नियंत्रण आले. अद्याप जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव कुठेही झाला नसल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात दोन लाख ३३ हजारांवर जनावरे असून त्यांच्या लसीकरणासाठी आतापर्यंत ९३३०० लसी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यापैकी ४४ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दळवी यांनी दिली. लसीकरणाची मोहीम राबवली जात असून वरिष्ठांकडून त्या-त्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात आहे.

लम्पी आजारावर थेट काम करणारी लस अद्यापही आलेली नाही. गेल्या वर्षी गोट फॉक्स या लसीच्या साह्यानेच प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रयत्न झाले. त्यात बहुतांश यशही आले होते. यंदा लम्पी स्कीनवरील स्वतंत्र लस मिळेल अशी अपेक्षा पशुपालकांना लागलेली होती. मात्र, अद्याप ही लस आलेली नसल्याने यंदाही गोट फॉक्स याच लसीचा आधार यंत्रणेला व पर्यायाने जनावरांना आहे.

आकडेवारी

मिळालेल्या लसी ९३३००

झालेले लसीकरण ४४०२४

एकूण जनावरे २३३२७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

WISMA Demand : गाळप हंगाम १५ नोव्हेंबरलाच सुरू करा; विस्माची मागणी

Farmer Loan Waive : खानदेशात अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा

Tur Cultivation : खानदेशात पूर्वहंगामी तूर जोमात; १५ हजार हेक्टरवर लागवड

Rabi Sowing : ‘रब्बी’ पेरणीला जिल्ह्यात वेग

Kolhapur Assembly Elections : कोल्हापूर जिल्ह्यात दुरंगी आणि तिरंगी लढतीने धुरळा उडणार, बंडखोरांचे आव्हान

SCROLL FOR NEXT