Lumpy Skin Disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीनमुळे मृत जनावरांची मिळणार भरपाई

Lumpy Skin Compensation : पशुवैद्यकीय विभागाने तपासणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला होता. त्यातील १८० मृत जनावरांच्या पालकांना पहिल्या टप्प्यात नुकसानभरपाई मिळाली.

Team Agrowon

Nipani News : गतवर्षी महाराष्ट्रात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग जास्त प्रमाणात झाला होता. त्यामुळे तब्बल वर्षभर जनावरांची खरेदी-विक्री बंद होती. तरीही त्याचा संसर्ग कालांतराने कर्नाटकात सीमाभागातही वाढत गेल्याने पशुपालक धास्तावले.

निपाणी तालुक्यात गतवर्षी लम्पी स्कीनने २२५ जनावरांचा मृत्यू झाला होता. पशुवैद्यकीय विभागाने तपासणी करून प्रशासनाला अहवाल सादर केला होता. त्यातील १८० मृत जनावरांच्या पालकांना पहिल्या टप्प्यात नुकसानभरपाई मिळाली. भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित ४५ पशुपालकांनाही येत्या चार दिवसांत भरपाई मिळणार आहे.

लम्पी स्कीनमुळे तब्बल एक वर्ष विविध ठिकाणचे जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पशुवैद्यकीय विभाग व प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या कालावधीत पशुपालकांसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

जनावरांचा खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाल्याने नुकसान सहन करावे लागले होते. तालुक्यातील अनेक बाजार बंद असल्याने जनावरांच्या बाजाराशी संलग्न व्यवसायही बंद होते. या व्यावसायिकांनाही इतर कामे करावी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Production : भाजीपाला आणि फळ पिकांच्या उत्पादनात वाढ; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा दावा

Silk Farming: रेशीम संगोपनगृहात उष्ण तापमान राखण्यासाठी प्रयत्न

Dairy Business: दुग्ध व्यवसाय : कृषी व्यवस्थेचा शाश्वत पाया

Global Climate Conference: हवामान होरपळ आणि बड्यांची टाळाटाळ

Jowar Farming: ज्वारीचा गोडवा वाढेल!

SCROLL FOR NEXT