Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत

टीम ॲग्रोवन

कोल्‍हापूर : ‘लम्पी स्कीन’ने (Lumpy Skin) त्रस्त झालेल्या राज्यातील पशुपालकांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. या आजाराने मृत (Animal Died Due to lumpy Skin) झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई (Lumpy Skin Compensation) दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंग (Sachhindra Pratap Singh) यांनी मंगळवारी (ता. ४) जुन्या आदेशात बदल करून नवीन आदेश काढला आहे.

लम्‍पी स्कीनची साथ आल्यानंतर मृत पावलेल्या जनावरांबाबत संबंधित पशुपालकांना अर्थसाह्य देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र जे पशुपालक हे अल्‍प भूधारक, अत्यल्‍प भूधारक आहेत, त्‍यांनाच हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हा लाभ केवळ एका शेतकऱ्या‍साठी तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंतच होता.

या शासन निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार, सर्व शेतकरी व पशुपालकांना या निर्णयाचा लाभ होईल. तसेच जनावरांच्या संख्येवर घातलेली मर्यादाही उठवण्याचा महत्त्‍व‍पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

...अशी मिळणार रक्कम

गाय किंवा म्‍हैस लम्‍पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, ओढकाम करणारी जनावरे, जसे की बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल, तर १६ हजार रुपये मदत देण्यात येईल.

- जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत

- अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल

- राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य

- केवळ ‘लम्पी स्कीन’ने मृत झालेल्या जनावरांनाच्या पशुपालकांनाच मिळणार भरपाई

‘लम्पी स्कीन’च्या आजाराने सर्व शेतकरी, पशुपालक व दुग्‍ध व्यावसायिक धास्‍तावले आहेत. या सर्वांचा विचार करून शासनाने सर्वच पशुालकांसाठी मदतीची व्याप्‍ती वाढविली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दूध उत्‍पादकांना दिलासा मिळेल.
संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT