Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Paddy Farming : यावर्षी मुरूड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील भातलावणीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
Published on

Palghar News : यावर्षी मुरूड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील भातलावणीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीपासूनच दमदार पावसाची सुरुवात झाली होती. यावर्षी मे महिन्यात तब्बल ८७८ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी, भातशेतीसाठी अनुकूल हवामान मिळाल्याने शेतकऱ्यांनी जोरदार तयारी करत पेरणीला सुरुवात केली.

मुरूड तालुक्यात सुमारे ३, ३०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. या भागात ‘सुवर्णा’, ‘जया’, ‘रूपाली’, ‘वाडा कोलम’, ‘रत्ना’, ‘शुभांगी’, ‘कर्जत’ आणि ‘पनवेल’ या जाती प्रामुख्याने लावल्या जातात.

यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे धूळपेरणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘रोहू पद्धती’ वापरून भात रोपवाटिका तयार केल्या. पाण्यात भिजवून बियाणे मोड आणून चिखलणीनंतर पेरणी करण्याची ही पद्धत कोकणातील अनेक शेतकऱ्यांनी यशस्वीपणे अवलंबली.

Paddy Plantation
Paddy Plantation : पालघरमध्ये पावसाचा जोर मंदावल्याने लावणीला वेग

पीक विम्यावरील विश्वास

पीक विमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदवले आहे. भातपिकाची आणेवारी ५१ टक्‍क्यांपेक्षा कमी असेल तरच विम्याची भरपाई मिळते, मात्र कोकणात सरासरी उत्पादन ६०-७० टक्‍क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे बहुतांश शेतकरी विम्यापासून वंचित राहतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असमाधान आहे.

कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, माती परीक्षण, हिरवळीचे खते, भात रोपवाटिका व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींवर प्रशिक्षण दिले गेले. तसेच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Paddy Plantation
Paddy Plantation : शिराळा तालुक्यात भात पेरणी ५० टक्के

नवीन पद्धतींचा प्रयोग

कृषी विभागामार्फत ‘सगुणा राईस टेक्निक’ (एसआरटी) व ‘चारसूत्री भातलागवड’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आली. यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असला तरी काही भागात प्रयोगशील शेतकरी यंत्र वापरून शेती करत आहेत.

मजुरांची टंचाई

यावर्षीही नेहमीप्रमाणे मजुरांची टंचाई जाणवली. नांगरणीसाठी प्रति दिवस एक हजार रुपये, पुरुष मजुरांना ६०० रुपये, तर महिलांना ३००-४०० रुपये दरम्यान मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. काही ठिकाणी मनरेगाच्या कामांमुळे मजुरांची उपलब्धता अत्‍यंत कमी होती, असेही बोलले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com