Solapur News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या बंदीच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील जनावरांच्या बाजारामध्ये ३ ते ८ जून दरम्यान ‘गोवंशां’चे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील बाजारात या आठ दिवासत बैल किंवा गाई यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात सोलापूर, सांगोला, बार्शी, अकलूज, मोडनिंब, वैराग या ठिकाणी जनाववरांचे आठवडे बाजार भरवले जातात. सोलापूरमध्ये मंगळवारी, वैरागला बुधवारी, बार्शी आणि मोडनिंबमध्ये शनिवारी, सांगोल्यात रविवारी जनावरांचे बाजार भरवले जातात. या बाजारांमध्ये बैल, म्हैस, संकरित गाई यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
खिलार जनावारांच्या खरेदी-विक्रीत आघाडीवर असणाऱ्या एकट्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४० ते ५० लाख रुपयांची उलाढाल होते. विशेषतः सांगोला आणि मोडनिंबच्या बाजारात गाई आणि बैलाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. पण या दिवशी या दोन्ही बाजारांतील गोवंशांचे व्यवहार बंद राहणार आहेत.
२८ ठिकाणी नाकाबंदी
ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैध वाहतूक होणार नाही, याची खबरदारी म्हणून शहर आणि जिल्ह्यात पोलिसांनी एकूण २८ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. त्यात अक्कलकोट, हैदराबाद, मंगळवेढा, विजयपूर, तुळजापूर आणि पुणे, होटगी रोड या ठिकाणांचा समावेश आहे.
जनावरांचे आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र हा आदेश रद्द केल्याची चर्चा आहे. सांगोला येथे भरणारा आठवडी जनावरांचा बाजार चालू ठेवण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल.-उत्तम खोकले, सचिव, बाजार समिती, सांगोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.