Poultry Farming  Agrowon
काळजी पशुधनाची

Desi Poultry Breed : कुक्कुटपालनात जातिवंत कोंबड्या वापरा

Poultry Farming : प्रधान शास्त्रज्ञ डॉ. बी. प्रकाश म्हणाले, की साहित्य वाटपामध्ये मिळणारा कोंबडी पिंजरा योग्य प्रकारे कसा वापरावा, पाळलेल्या कोंबड्यांचे योग्य आहार व्यवस्थापन कसे असावे.

Team Agrowon

Amaravati News : भारतीय कोंबडीस मागणी आहे. त्याचा विचार करूनच केंद्रीय कुक्कुट संशोधन संचालनालय कार्य करीत असून, शेतकऱ्यांनी जातिवंत कोंबड्या पाळून कुक्कुटपालन व्यवसायास नवीन रूप द्यावे, असे प्रतिपादन कुक्कुट संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. राजकुमार यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर आणि केंद्रीय कुक्कुट संशोधन संचालनालय (हैदराबाद) यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित भटक्या व विमुक्त जाती उपयोजनेअंतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन व व्यवस्थापन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

या वेळी अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह, केंद्रीय कुक्कुट संशोधन संचालनालयाचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. बी. प्रकाश व डॉ. विजयकुमार तसेच कृषी विस्तार विषय विशेषज्ञ प्रतापराव जायले व पशुविज्ञान विभाग विशेषज्ञ महेश आखूड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधान शास्त्रज्ञ डॉ. बी. प्रकाश म्हणाले, की साहित्य वाटपामध्ये मिळणारा कोंबडी पिंजरा योग्य प्रकारे कसा वापरावा, पाळलेल्या कोंबड्यांचे योग्य आहार व्यवस्थापन कसे असावे. सोबतच परसबागेतील कुक्कुटपालनाचे फायदे स्पष्ट करून त्यांनी सांगितले.

डॉ. विजयकुमार म्हणाले, की आम्ही आपल्या भागातील भटक्या व विमुक्त जातीतील लोकांचे जीवनमान उंचावण्याचा संकल्प घेतला असून कोंबडी पालनास साह्यता करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवीत आहोत, त्यामध्ये लहान पिलांची मरतुक कमी करणे, योग्य आरोग्य व्यवस्थापन आणि लसीकरण करून योग्य गट तयार करणे जेणेकरून योग्य मोबदला मिळेल, हा उद्देश कार्यक्रमाचा आहे.

वनराज, गिरिराज कोंबडी हे आमचे संशोधन असून या वंशाचे पक्षी वार्षिक १५० ते १६० अंडी उत्पादन देतात, त्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीमध्ये वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मोलाचे ठरेल असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना परसबागेतील कोंबडी पालनास उपयोगी पिंजरे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला भिवरी, मेहा, धनज, पिंपरी गोंड, बिबखेड, घोडेगाव, वाशीम या गावांतील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT