Poultry Industry: राज्यात मांसल कोंबडीचे दर कोसळले! पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत

Chicken Price Drop: राज्यात मांसल कोंबडीच्या दरात मोठी घसरण झाली असून जीबीएस आजाराच्या भीतीमुळे विक्रीत घट झाली आहे. पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असले, तरी मार्चनंतर दर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
Poultry
PoultryAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: गुलियन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) परिणामी शेतीपूरक कुक्‍कुट व्यवसायाला फटका बसल्याने चिकनच्या मागणीत घट होऊन दरही दबावात आले आहेत. सध्या राज्यात सुमारे ४०० टन इतकी विक्री कमी होत दर पूर्वीच्या ८० रुपये किलोवरून ६० ते ६५ रुपयांवर आले आहेत. मांसल कोंबडीचा उत्पादकता खर्च ८५ ते ९० रुपये असल्याने या दरातून या खर्चाची भरपाई देखील शक्‍य होत नसल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

शेतीतून अपेक्षीत उत्पादकता व उत्पन्न होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी करारावर तर काहींनी वैयक्‍तिक पोल्ट्री व्यवसायाची कास धरली आहे. राज्यातील अशा व्यावसायिकांची संख्या सुमारे सात लाखांच्या घरात आहे. दरम्यान राज्यातील काही भागांत दूषित पाणी पिल्यामुळे जीबीएसचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती पुढे आली.

Poultry
Broiler Poultry Business : दुष्काळी माणमध्ये आधुनिक ‘पोल्ट्री’

पाणी दूषित होण्याच्या नेमक्‍या कारणांचा उलगडा न झाल्याने याच खापर पोल्ट्री व्यवसायावर फोडण्यात आले. त्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाकडून खडकवसाला परिसरातील ११ कुक्‍कुटपालन केंद्रातील नमुने घेत ते राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले. त्यातील काही पक्ष्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्‍टर जेनुनी हा जीवाणू आणि नोराव्हायरस हा विषाणू आढळला.

मात्र कॅम्पिलोबॅक्‍टर जेजुनी हा कोंबड्यांच्या आतड्यांमध्ये बहुतेक वेळा आढळतो, तसेच तो इतरही प्राण्यांमध्ये असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. शिजवलेले मांस सुरक्षित असल्याचा दावा ‘पशुसंवर्धन’कडून करण्यात आला. मात्र त्यानंतरही नागरिकांनी या आजाराची धास्ती घेतली.

Poultry
Poultry Farming: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय – कुक्कुटपालनाचा सुवर्णकाळ!

त्याचा परिणाम छोट्या कुक्‍कुट व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांवर झाला आहे. दोन किलो वजन असलेल्या पक्ष्यांचा उत्पादकता खर्च ८५ ते ९० रुपये आहे. सध्या बाजारात मांसल पक्षी विक्री दर ६० ते ६५ रुपये आहे. परंतु मार्चनंतर बाजारात सुधारणा होत हे दर १०० रुपये किलोचा टप्पा पार करतील, असा विश्‍वासही या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला. त्यांच्या मते फेब्रुवारीत एकाचवेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर मांसल पक्ष्यांची आवक होते. त्याचा परिणाम दरावर होतो. त्यानंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होत तेजी येते, असा सर्वमान्य अंदाज आहे.

राज्यातील कुक्‍कुटपालन व्यवसाय

रोजची चिकन विक्री : २ हजार टन

सध्या चिकन विक्री : १६०० टन

विक्रीतील घट : ४०० टन

जीबीएस अफवेपूर्वीचे दर : ८५ ते ९० रुपये किलो

सध्याचे दर : ६० ते ६५ रुपये किलो

यापूर्वी वातावरणात गारवा होता त्यामुळे ज्यांच्याकडे बॅच होती, अशा पक्ष्यांचे लहापनण थंडीत गेले. आता तापमानात वाढ झाली आहे. हीटस्ट्रोकचा प्रादुर्भाव होत काही प्रमाणात मरतुक झाली. हा दरवर्षी घडणारा प्रकार आहे. त्यातही फेब्रुवारीत दरात पडझड होणे हे पण गेल्या अनेक वर्षांतील अनुभवानुसार आहे. मार्चनंतर दरात निश्‍चित सुधारणा होईल.
श्रीकृष्ण ऊर्फ दादा गांगुर्डे, पोल्ट्री व्यावसायिक, नाशिक
सध्या दरातील घसरणीचा सर्वाधिक फटका शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या छोट्या पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून उकडलेले चिकन खाणे आरोग्यदायी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांनी देखील कोणतीच भीती बाळगण्याची गरज नाही.
शुभम महाले, संचालक, अमरावती पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com