Black Quarter Disease In Animals
Black Quarter Disease In Animals Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांचे फऱ्या विरोधी लसीकरण सुरु झालंय?

Roshani Gole

पावसाळा सुरु झाला कि वातावरणात अनेक बदल होत असतात. या बदलत्या वातावरणात अनेक सुक्ष्मजीवाणुची वाढ जोमाने होत असते. पावसाळ्यात (rainy season)जनावरांना अनेक रोगांची बाधा होण्याची शक्यता वाढते. त्यापैकीच एक म्हणजे एक टांग्या (black quarter) आजार. सुदृढ किंवा मांसल पेशी जास्त असलेल्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. म्हशींमध्ये (buffalo)फऱ्या आजाराचे प्रमाण कमी असते. हा आजार क्लोस्ट्रीडीयम चोवाय (Clostridium Chovai) या जिवाणूमुळे होतो

- या आजारामध्ये जनावरांच्या पायाच्या भागावर सूज आल्याने, जनावरे लंगडायला लागतात.

- सूज आलेल्या ठिकाणी दाबून पाहिल्यास, चरचर असा आवाज येतो.

- जनावरांना ताप येऊन, तापाची तीव्रता १०४ अंश फॅरनहाइटपेक्षा जास्त असते.

- जनावरांचे खाणे-पिणे कमी होऊन रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते.

- बाधित जनावरांवर वेळीच उपचार न केल्यास १२ ते ४८ तासामध्ये जनावरे दगावू शकतात.

फऱ्या आजारावर एकमात्र उपाय म्हणजे पावसाळ्यापूर्वी या रोगाविरुद्ध जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतलं पाहिजे. गाय, बैल आणि नवजात वासरांमध्ये या आजारचे प्रमाण जास्त असते. या आजाराची बाधा झाल्यास पशुपालकांना उपचाराचा खर्चकरावा लागतो. वेळेत योग्य ते उपचार न झाल्यास जनावर दगावण्याची शक्यता असते.

असं होऊ नये म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत राज्याच्या काही भागात घटसर्प आणि फऱ्या रोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झालंय. तुम्ही तुमच्या पशुधनाचं केलं नसेल तर करून घ्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये बिनधोकपणे गव्हाची अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलात आग

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

SCROLL FOR NEXT