Washim News : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले. परंतु त्यांनी जाहीर केलेल्या मदतीचा शासन आदेशात उल्लेख नाही. शासनाने शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी तसेच कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांनी केली..जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार झनक यांनी मार्गदर्शन केले. .Farm Loan Waiver : शेती कर्जमाफीची अनिवार्यता!.श्री. झनक, काँग्रेस कमिटीचे प्रदेश पदाधिकारी ॲड. दिलीपराव सरनाईक, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजूभाऊ चौधरी, किसनराव मस्के, परशराम भोयर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते..Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.शासनाने शेतकऱ्यांची तुटपुंजी मदत देऊन थट्टा चालवली आहे. याचा निषेध करीत जिल्हा कचेरीसमोर जिल्हा काँग्रेस कमेटीने नुकतेच चटणी-भाकर खाऊन अनोखे आंदोलन केले होते. वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. हजारो हेक्टर जमीन खरडून गेली..शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव मदत हवी. १८५०० मदत जाहीर केली जाते पण आदेशात त्याचा उल्लेख नाही. आता जो निधी देत आहेत, तेवढ्यात काहीही होणार नाही. उलट हेक्टरी ५० हजार आणि सरसकट कर्जमाफी ही नितांत गरज झाली आहे.- आमदार अमित झनक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, वाशीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.