असे ओळखा जनावरांच्या पोटाचे आजार

जनावरांचे आरोग्य हे मुख्यतः त्यांच्या पोटाचे आरोग्य आणि खालेल्या अन्नाचे पचन होऊन त्यांच्याकडून होणारी कार्ये यांवर अवलंबून असते.
Animals suffer from stomach problems
Animals suffer from stomach problems Agrowon

जनावरांनी दिवसातून ८ ते १० तास रवंथ (rumination) केले पाहिजे. जनावरांना त्यांच्या वयानुसार आणि शरीरिक अवस्थेनुसार आहारातील घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा (green), कोरडा (dry fodder) चारा तसेच पशुखाद्य सोबतच क्षार मिश्रणाचा (mineral mixture) समावेश असला पाहिजे. जनावरांचे आरोग्य हे मुख्यतः त्यांच्या पोटाचे आरोग्य आणि खालेल्या अन्नाचे पचन होऊन त्यांच्याकडून होणारी कार्ये यांवर अवलंबून असते. जनावरांच्या पोटात बिघाड झाल्यास खालेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही. याचा परिणाम जनावरांच्या शरीरपोषणावर होऊन दूध उत्पादनात घट दिसून येते.

जनावरांतील पोटाचे आजार असे ओळखा

  • दैनंदिन जनावरांच्या शेणाचे निरीक्षण करावे, शेण खूप घट्ट, पातळ आहे का ? किंवा त्यामध्ये इतर काही संशयास्पद अनावश्यक घटक दिसतात का ते पाहावे आणि गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • जनावरांच्या शारीरिक हालचालींचे बारीक निरीक्षण करावे.

  • जनावर अस्वस्थ वाटत असल्यास कोणत्या गोष्टीमुळे ते अस्वस्थ होत आहे याची कारणे जाणून घ्यावीत.

  • जनावरांच्या पोटात वेदना होत असल्यास जनावरे चारा खाण्याचे प्रमाण कमी करतात किंवा खातच नाहीत.

  • जनावरांच्या पोटात गॅस झाला असेल तर डबडब असा आवाज येतो. अपचन झाले असेल तर गडगड असा आवाज येतो.

  • जनावरांच्या पोटाचे आरोग्य चांगले असेल तर पोटाच्या डाव्या बाजुस हाताची मूठ बंद करून दाबल्यास ५ मिनिटात ७ वेळा हात बाहेर ढकलला जातो

  • जनावरांचचे पोट गच्च असेल तर जनावर पाठीचा कणा सतत ताणून धरते.

  • पोटाच्या तक्रारीमुळे बरेचदा वायू गुरुद्वारातून बाहेर टाकला जातो.

  • पोटातील विकारांमुळे जनावर चारा, खाद्य कमी खाते. पाणीही कमी पिते परिणामी त्याचा उत्पादनावरती नकारात्मक परिणाम होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com