Bird Flu Agrowon
काळजी पशुधनाची

Bird Flue : टेक्सासमध्ये जनावरे, मानवात ‘बर्ड फ्लू’

Poultry Disease : अमेरिकेतील टेक्सास राज्यात दुधाळ जनावरांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे तेथील राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केले आहे.

Team Agrowon

New York News : अमेरिकेतील टेक्सास राज्यात दुधाळ जनावरांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे तेथील राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्ष्यांना होणारा हा साथीचा रोग कोविड रोगापेक्षा शंभर पटीने भयंकर ठरू शकतो, त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

एच फाइव्ह एन वन (H5N1) अर्थात बर्ड फ्लू या पक्ष्यांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगाचे अमेरिकेतील बहुतेक प्रत्येक राज्यातील व्यावसायिक व परसबागेतील पोल्ट्री उद्योगात २०२० नंतर मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे या रोगाला कारणीभूत विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) विकसित झाला आहे.

मात्र पक्ष्यांपुरता मर्यादित असलेला हा रोग अमेरिकेतील चार राज्यांत अलीकडेच सस्तन जनावरांत म्हणजे गायींच्या कळपात आढळला आहे. त्याचबरोबर टेक्सास राज्यात या जनावरांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या रोगाची लागण झाल्याचे राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केले आहे.

पिट्सबर्ग येथील बर्ड फ्लू रोगाचे संशोधक सुरेश कुचिपुडी यांच्या म्हणण्यानुसार साथीचा प्रमुख रोग म्हणून बर्ड फ्लूचे नाव अनेक वर्षांपासून अग्रस्थानावर आहे. जगभरात आढळलेल्या घटनांवरून हा रोग केवळ पक्ष्यांपुरता मर्यादित नाही. तर जनावरे व माणसे यांच्यातही संक्रमण करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्यामुळे हा जगातील सर्वांत मोठा साथीच्या रोगाचा धोका आहे, असे कुचिपुडी यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील रोग नियंत्रण व प्रतिबंध विभागानेही वेळीच धोका ओळखून तातडीचे सर्व उपाय करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात बर्ड फ्लू रोगाशी संबंधित उद्योगांव्यतिरिक्त सार्वजनिक स्तरावरील नागरिकांना मात्र या रोगाचा धोका नसल्याचेही या विभागाने स्पष्ट केले आहे. हा रोग मानवामध्ये संक्रमित होईल असे कोणते बदलही सध्या आढळले नसल्याचेही अमेरिकी कृषी विभागाने म्हटले आहे.

विषाणूचे म्युटेशन शक्य...

औषध उद्योगातील लसनिर्मिती विषयातील सल्लागार आणि कॅनडा येथील एका कंपनीचे संस्थापक जॉन फुलटन यांनी याविषयी बैठक आयोजित केली होती. त्यात ते म्हणाले, की या विषाणूचे ‘म्युटेशन’ होऊ शकते. त्यातून मृत्यूचा दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कोविड रोगापेक्षाही हा रोग शंभर पटीने भयंकर आहे असे वाटते. जर मानवात या रोगाचे संक्रमण झाले तर केवळ मृत्युदर घटण्याची आशा करणे एवढेच आपल्या हाती उरेल.

भारतात बर्ड फ्लू मानवात संक्रमित झाल्याच्या कोणत्याही घटनांची नोंद नाही. आपल्या देशातील पोल्ट्री व्यवस्थापन काटेकोर असून, आरोग्य स्वच्छतेच्या सर्व निकषांचे पालनदेखील केले जाते. शिवाय आपल्याकडे चिकन देखील शिजवून खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे भारतात अशा रोगांचा कोणताही धोका नाही हे ठामपणे सांगावेसे वाटते.
- उद्धव आहेर, पोल्ट्री उद्योजक, नाशिक, उपाध्यक्ष महाराष्ट्र फार्मर्स ॲण्ड ब्रीडर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

Mushroom Processing: अळिंबीचे २४ नवे प्रकल्प

Soil Health: मराठवाड्यातील जमिनीमध्ये नत्र, स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता

Maize MSP: हमीभावाने मका खरेदी सुरू

Weather Update: चार दिवस थंडी कमी राहणार

SCROLL FOR NEXT