Bail Pola  Agrowon
काळजी पशुधनाची

Bail Pola 2024 : ऊसबिले न मिळाल्याचा पोळ्याच्या बाजाराला फटका

Bail Pola Celebration : दरवर्षी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडून पोळा सणाला ऊसबिलाचा हप्ता दिला जातो. मात्र, यंदा पोळा सण दोन दिवसांवर आला असतानाही त्यापैकी एकाही साखर कारखान्याने बिल दिले नाही.

Team Agrowon

Solapur News : दरवर्षी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडून पोळा सणाला ऊसबिलाचा हप्ता दिला जातो. मात्र, यंदा पोळा सण दोन दिवसांवर आला असतानाही त्यापैकी एकाही साखर कारखान्याने बिल दिले नाही. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत नसल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे.

सोमवारी (ता. २) पोळा सण आहे. काळ्या आईची सेवा करणाऱ्या बैलजोडीची वर्षातून एकदा श्रावण अमावस्येला सजवून त्यांची खांदेमळणी, पूजा केली जाते. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांसह मंगळवेढा, उत्तर सोलापूरचा काही भाग वगळता शहरांसह गावातील दुकाने सजली आहेत. कंडे, गोंडे, मोरक्या, रंग आदी विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र, बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ दिसत नाही.

जिल्ह्यातील काही कारखाने दरवर्षी पोळा गोड व्हावा, यासाठी दरवर्षी पोळा सणाला ऊसबिलाचा हप्ता देतात. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, कारखान्यांनी सण दोन दिवसांवर येऊनही ऊसबिलाचा दुसरा हप्ता दिला नाही. सध्या आडसाली ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे. गतवर्षी पावसाअभावी ऊस क्षेत्र घटले आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने ऊस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र उपलब्ध आहे.

त्यातच उजनी धरणही लवकर भरल्याने ऊस लागवड होत आहे. परंतु ऊस लागवडीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. एकीकडे उसासह सर्वच पिकांचे उत्पादन खर्च वाढले असताना हाती ऊसबिले न पडल्याने पोळा कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. परिणामी बाजार सजूनही खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिसत नाही. त्याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे.

बैलबारदाना घटल्याचाही परिणाम

बैलांचा सांभाळ, त्यासाठी गडी न मिळणे, वाढलेली मजुरी यावर होणारा खर्च आणि ट्रॅक्टरसह आधुनिक तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या घटली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत.

त्यातून उत्पादन खर्च कमी होत असल्याने एकेकाळी एक ते पाच - सहा जोड बैलबारदाना असलेल्या शेतकऱ्यांकडेही आज बैलजोडी नाही. पण अनेक ट्रॅक्टर आहेत. त्यातच बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तयार मिळत आहेत. परिणामी पोळा सणाच्या तयारीसाठी दिसणारी लगबग आज दिसत नाही. त्याचा परिणाम बाजारावर झाला असून शेतकरी सणाच्या आदल्या दिवशीच खरेदी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; सोमवारपासून विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Jowar Procurement : अमरावतीत ज्वारीची खरेदी होणार

Non Cognizable Offence: आमदार संजय गायकवाड यांच्यावर मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

Crop Insurance Payout : पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांना ५५ कोटींचे पीकविमा भरपाई

POCRA Scam : पोकरातील गैरप्रकारप्रकरणी अहवालानंतर कारवाई

SCROLL FOR NEXT