Lumpy Skin Disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Disease Compensation : नगर जिल्ह्यात पशुपालकांना अकरा कोटी रुपयांची मदत

नगर जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना लम्पीने त्रस्त केले. आजाराची व्याप्ती वाढती असल्याने पशुपालक हैराण झाला होता. दुधाळ जनावरांनाच लम्पी स्कीन रोगाने घेरल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Nagar News : नगरपी’मुळे नगर जिल्ह्यात चार हजार ३५९ जनावरांचा यंदा मृत्यू झाला. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील लम्पी (lumpy Skin) मृत्यू पावलेल्या जनावरांपैकी ३ हजार ९८४ जनावरांच्या पशुपालकांना प्रकरणे मंजूर होऊन ११ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. उर्वरित पशुपालकांनाही लवकरच मदत (Compensation) मिळणार आहे.

नगर जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना लम्पीने त्रस्त केले. आजाराची व्याप्ती वाढती असल्याने पशुपालक हैराण झाला होता. दुधाळ जनावरांनाच लम्पी स्कीन रोगाने घेरल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. दूध उत्पादनावरही परिणाम झाला. लम्पीच्या बाधेने नगर जिल्ह्यात तब्बल ४ हजार ३५९ जनावरे दगावली.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. महसूलमंत्री व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने लम्पीने मृत्यू झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत सरकारने दिली, अशी मदत देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी मार्चअखेर ११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केले.

दोन दिवसांत ही रक्कम त्यांना मिळू शकेल. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२२मध्ये जिल्ह्यात लम्पीने थैमान घातले होते. राज्यात इतर जिल्ह्यात हा आजार आटोक्यात आलेला असताना नगर जिल्ह्यात त्याने सरकारी यंत्रणा, तसेच शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले होते. प्रशासनाने स्वच्छ गोठ्यासारखे उपक्रम राबवले. तब्बल १४ ते १५ लाख जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली. त्यामुळे साथ आटोक्यात येण्यास मदत झाली.

२२ जणांनी नाकारली भरपाई

राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावण्याचा प्रयत्न केला. मार्चअखेर सुमारे चार हजार प्रकरणांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांनी भरपाई घेण्यास नकार दिला.

आम्ही हौसेने जनावरे पाळली होती. त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्य समजले. त्यासाठी भरपाई घेण्याची आमची मानसिकता नसल्याचे त्यांनी पशुसंवर्धन विभागाला लेखी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT