Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : उपचार आणि लसीकरणावर पशुसंवर्धन विभागाचे लक्ष्य

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : लम्पी स्कीन आजार (Lumpy Skin) नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) कंबर कसली आहे. आजारी जनावरांवर उपचार (Animal Treatment) व सरसकट जनावरांचे लसीकरण (Animal Lumpy Vaccination) यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, जालना, नांदेड, उस्मानाबाद व बीड या ६ जिल्ह्यांमध्ये मंगळवारपर्यंत (ता. २७) जवळपास ५३ जनावरांचा आजवर मृत्यू झाला आहे.

आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा नियोजन समिती मार्फत लम्पी स्कीन आजारावर नियंत्रणासाठी एक कोटी रुपयाचा निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे उपचारासाठी लागणारा खर्च तत्परतेने करणे शक्य होणार आहे. याशिवाय शासकीय व खासगी पशू वैद्यकांना महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने २४ सप्टेंबर २०२२ रोजी दिलेल्या सुधारित उपचार प्रोटोकॉल नुसार उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात साधारणतः १५० ते २०० खासगी डॉक्टरांच्या सहकार्यातून लसीकरणाचे काम केले जाते आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या सोयगाव व सिल्लोड तालुक्यात लम्पी आजारग्रस्त जनावरांची संख्या थोडी जास्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील १०३ गावात लम्पी आजाराने ७२६ जनावरे बाधित आहेत. ४५९ जनावरे उपचाराअंती बरे झाले आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत.

५ लाख ३५ हजार जनावरांपैकी ३ लाख ५६ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आजाराविषयी जागरूकता करण्यासह नेमकी कोणती खबरदारी पशुपालकांनी घ्यावी याविषयी प्रबोधनाचे कामही केले जाते आहे. आणखी साधारणतः एक लाख लसीकरण झाल्यानंतर संपूर्णतः लसीकरणाचे काम पूर्ण होणे होईल अशी आशा जिल्हा पशुसंवर्धन विभागाला आहे.

‘लम्पी स्कीन’ बाधित जनावरांची रक्त तपासणी...

लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली जाते आहे. त्या तपासणीत लम्पीशिवाय जनावरांवर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटविणाऱ्या आजारांचेही आक्रमण झाल्याचे दिसून आल्याची, माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. आपल्याकडील पशूंच्या आहाराविषयी, स्वच्छतेविषयी सजग असलेल्या पशुपालकांकडील जनावरांमध्ये मात्र असा आजार दिसून येत नसल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

आजारी जनावरांचा उपचार व लसीकरण यावर लक्ष केंद्रित केले आहे. जवळपास ६५ टक्के लसीकरण आटोपले असून, जनावरांमधील लम्पी स्कीन आजार नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT