Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Census : पशुसंवर्धन विभाग २१ व्या पशुगणनेसाठी सज्ज

Team Agrowon

Latur News : एक सप्टेंबरपासून होणाऱ्या २१ व्या पशुगणनेच्या यशस्वीतेसाठी पशुपालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्याकडील सर्व प्रकारच्या पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांना पुरवावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे यांनी केले.

पशुगणनेच्या तयारीसाठी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सोनवणे म्हणाले, की पशुपालकांनी ही माहिती केवळ पशुसंवर्धन विभागासाठीच नाही, तर संपूर्ण ग्रामीण विकासासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

त्यामुळे पशुपालकांनी प्रगणकांना योग्य माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे. डॉ. कदम पशुगणना प्रक्रियेसाठी मास्टर ट्रेनर असून त्यांनी पशुगणनेचे प्रशिक्षण दिल्ली येथे घेतले आहे. त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी मार्गदर्शन केले. पशुगणना एक सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

या गणनेत ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबातील सर्व प्रकारच्या पशुधनाची संख्या नोंदविणे आवश्यक आहे. गणनेच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी विशेष ऑनलाइन प्रणालीचा मोबाइल ॲपद्वारे वापर करण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सहायक आयुक्त डॉ. सत्यविजय जाधव, डॉ. वीणा गर्जे, डॉ. अमर सोमवंशी व डॉ. योगेश बायस यांनीही विविध विषयावर मार्गदर्शन केले. अधिकारी, कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mosambi Fruit Fall : मोसंबीची निम्मी फळगळ ही वनस्पती शास्त्रीय कारणांनी

Cotton, Soybean Subsidy : कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द; ७/१२ वरील नोंदीवरुनही मिळणार अनुदान

Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघाच्या वार्षिक सभेत गोंधळ, पोटनियम दुरुस्तीचा ठराव मंजूर

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

Silage Production : यांत्रिक मुरघास निर्मितीतील ‘पेंडगाव आकाश’ कंपनी

SCROLL FOR NEXT