Age identification of cow from teeth method  Agrowon
काळजी पशुधनाची

गायीचे दातांवरून वय कसे ओळखावे?

सर्व जनावरांमध्ये माणसाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात दोनदा दात येतात. पाहिले येणारे दुधाचे दात. दुधाचे दात पडल्यावर येतात कायमचे दात. दुधाचे दात आकाराने लहान व पांढऱ्या रंगाचे असतात. मात्र कायमचे दात आकाराने मोठे असून पिवळसर रंगाचे असतात.

Team Agrowon

जनावरांच्या दातांचे वर्गीकरण

  1. समोरील पटाशीचे दात

  2. बाजूचे सुळे दात

  3. दाढा – समोरील आणि मागील दाढा

जनावरांचे वय (animal age) ओळखण्यासाठी समोरील पटाशीच्या दातांचा उपयोग केला जातो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यासारख्या प्राण्यांमध्ये वरच्या जबड्यातील पटाशीचे दात (teeth) नसतात, त्याजागी कठीण जागा असते. खालच्या जबड्यात पटाशीचे आठ दात असतात. तसेच पुढील व मागील जबड्यात प्रत्येकी सहा- सहा दाढा असे एकूण ३२ दात असतात.

गायीचे दात

  • दुधाच्या दातांमध्ये आठ पटाशीचे दात आणि समोरील बारा दाढा असे एकूण वीस दात असतात.

  • दुधाचे दात पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत असतात, पुढे ते पडून पक्के दात येतात.

  • कायमचे पक्के दात ३२ असतात.

  • दोन ते अडीच वर्षामध्ये मधले दोन पक्के पटाशीचे दात येतात.

  • तीन ते साडे तीन वर्षात चार पक्के पटाशीचे दात येतात.

  • चार ते पाच वर्षात सहा पक्के पटाशीचे दात येतात.

  • पाच ते सहा वर्षात आठ पक्के पटाशीचे दात येतात.

  • सहा ते सात वर्षात पूर्ण पक्के दात येतात

  • बारा वर्षाच्या पुढे दातांची झीज झाल्यामुळे दातावरून वय ओळखणे अवघड जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT