Beed News: येथे भरारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी (ता. ८) काव्या ॲग्रो, मोंढा रोड, गेवराई, जि. बीड येथे तपासणी केली. याप्रकरणी विनापरवाना व बोगस खत विक्री प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..कृषी विभागाच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी मिश्र खताचे ग्रेड एनपीके १०:२०:२० व २०: २०:००. मजकुराचे एकूण ५५ बॅग (प्रति बॅग ५० किलो) असल्याचे आढळून आले होते. याबाबत काव्या ॲग्रो यांना खताच्या खरेदीची बिले मागितले असता त्यांच्याकडे बिल नसल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित उत्पादक शिवाजी अॅग्रो क्रॉप जालन्याचे प्रतिनिधी भागीरथी के. यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता. .Fake Fertilizer : खतामध्ये आढळले चक्क प्लॅस्टिकचे दाणे .त्यांनी, शिवाजी अॅग्रो क्रॉप सायन्स जालन्याचा परवाना करार रद्द करण्याबाबत ४ फेब्रुवारी २०२५ रोजी कृषी संचालक (नि.गुनि.) यांना प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीने कोणत्याही प्रकारचे उत्पादन व पुरवठा केला नाही, असे कळविले. याबाबत वितरक कंपनीचे संचालक निखिल कासोळे यांना भ्रमणध्वनीद्वारे कृषी केंद्र चालक प्रतिनिधी राधेश्याम काकडे यांनी विक्री केंद्रात बोलावून घेतले..Fake Fertilizer Allegations: ‘इफ्को’वर बनावट खतनिर्मितीचा आरोप निराधार.श्री. कासोळे यांना संबंधित खत कृषी गौरव फर्टिलायझर (ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्याकडून सिलीकॉन खत या नावाने खरेदी करून ते खत १०:२०:२० व २०:२०:०० या खताच्या बॅग भरून मे. काव्या अॅग्रो गेवराई यांना दुकानदारास दिले याबाबत लेखी खुलासा दिला. जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी साहिल सय्यद, मोहीम अधिकारी सायप्पा गरांडे, जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक वल्लभ भोसले यांच्या उपस्थितीत गेवराईचे खत निरिक्षक तथा कृषी अधिकारी (गु. नि.) गणेश हिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोगस खत विक्री करणारे काव्या ॲग्रोचे प्रतिनिधी राधेशाम काकडे व खत पुरवठा करणारी कंपनी विदूत ॲग्रो केम प्रा. लि. रायगडचे संचालक निखिल कासोळे यांच्या विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे..जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. सुभाष साळवे, गुणनियंत्रणचे तंत्र अधिकारी आशिष काळूसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.यानिमित्ताने जिल्ह्यात कुठेही विना परवाना, अनधिकृत कृषी निविष्ठा विक्री होत असल्यास नजीकच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.समाप्त.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.