Chhatrapati Sambhajinagar/Beed News: मराठवाड्यात ५३२८ रुपये या आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी सुरू केलेल्या खरेदी केंद्रापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३, तर बीड जिल्ह्यात २३ ठिकाणी सोयाबीन खरेदीला प्रतिसाद मिळत आहे..महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीसाठी एकूण ९ केंद्र सुरू करण्यात आली. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर खुलताबाद व पाचोड या तीन केंद्रांवरच सोयाबीन खरेदीला आजवर प्रतिसाद मिळाला. या तीनही केंद्रांवरून सुमारे १०२ शेतकऱ्यांकडील १६२९ क्विंटल सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी केंद्रावर आतापर्यंत १२ शेतकऱ्यांकडून २२१ क्विंटल ५० किलो सोयाबीनची खरेदी करण्यात आली. तर खुलताबाद केंद्रावरून २३ शेतकऱ्यांकडून २७२ क्विंटल ५० किलो, तसेच पाचोड केंद्रावरून ६७ शेतकऱ्यांकडून ११३५ क्विंटल खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनचा समावेश आहे..Soybean Procurement Center: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक.बीड जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी तब्बल २४ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रापैकी थेरला येथील केंद्र वगळता आतापर्यंत सर्व २३ केंद्रावर २८६६ शेतकऱ्यांकडून ५८ हजार ७१२ क्विंटल ४ किलो सोयाबीनची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या या सोयाबीनपैकी २८ हजार १०० क्विंटल सोयाबीन अजूनही गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे.याशिवाय ८३९ शेतकऱ्यांना त्यांच्या १७ हजार ३३२ क्विंटल सोयाबीनचे देयक अदा करण्यात आल्याची माहितीही मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिली..Soybean Procurement : सोयाबीन खरेदीचे निकष शिथिल करा; आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मागणी.बीडमध्ये १८ हजार ६१६ नोंदणीबीड जिल्ह्यातील २४ केंद्रांवरून आतापर्यंत १८ हजार ६१६ शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या या शेतकऱ्यांपैकी ७२५५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २८६६ शेतकरी आतापर्यंत प्रत्यक्ष खरेदीसाठी आल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ७५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २५५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले आहे..छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्यासाठी १९ केंद्रेमक्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावरून सध्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत सुमारे २२०० शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी दिली. १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी व त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू केली जाणार आहे. नोंदणीसाठी बायोमेट्रिक प्रणाली अत्यावश्यक करण्यात आली आहे. शेतकरी वगळता कोणी त्यामध्ये आपला मका आधारभूत किमतीने विकू नये यासाठी हे आवश्यक आहे. त्याशिवाय मका खरेदीची प्रक्रिया पुढे जाणार नसल्याचे श्री. राठोड यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.