दातावरून शेळ्यांचे वय कसे ओळखावे?

जनावरांचे दात दोन प्रकारचे असतात. जन्मतः किंवा प्रथम येणाऱ्या दातांना दुधाचे दात म्हणतात. खालच्या जबड्यातील समोरील आठ दातांना कापणारे दात म्हणतात.
Age identification of goat by teeth method
Age identification of goat by teeth method

जनावरांचे दात दोन प्रकारचे असतात. जन्मतः किंवा प्रथम येणाऱ्या दातांना दुधाचे दात म्हणतात. खालच्या जबड्यातील समोरील आठ दातांना कापणारे दात  म्हणतात. त्यांचे मुख्य काम अन्नाचे तुकडे करणे, केलेल्या तुकड्यांचे अजून बारीक तुकडे करण्यासाठी दाढाचा वापर केला जातो. करडाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच त्यांना दुधाच्या दाताच्या (milk teeth) मधल्या तीन जोड्या येत असतात. बाहेरील चौथी जोडी त्यांना चौथ्या आठवड्यात येत असते.  कालांतराने जसे करडू मोठे होत जाते तसतशे दुधाचे दात पडून त्याठिकाणी कायमचे दात (permanent teeth) येत असतात.

हेही पाहा -  जनावरांच्या दातावरून वय ओळखणे

आपण जर शेळी स्थानिक बाजारातून किंवा शेळीपालकाकडून विकत घेत असाल. तर ती शेळी किंवा बोकड १ ते ३ वर्ष वयोगटातील असायला हवा. कमी वयाच्या शेळ्या विकत घेतल्या, तर आपल्या कळपात जास्त दिवस राहून जास्त उत्पन्न देऊ शकतात. यासाठी शेळीचे अचूक वय ओळखून खरेदी करता आली पाहिजे.

शेळ्यांच्या वरच्या जबड्यात समोरील दात नसतात. त्या जागी कठीण मांसल भाग असतो. खालच्या जबड्यात समोरील बाजूस एकूण आठ दात असतात. दुधाचे दाट छोटे आणि धारधार असतात. दुधाचे दात हे विशिष्ट वयापर्यंतच असतात, त्यानंतर ते पडून त्या जागी कायमचे दात येत असतात.   हेही पाहा- जनावरांना वरचे दात नसून पण दातांवरून वय कसे ओळखाल? पहिली जोडी- १५ ते १८ महिने वय असताना दुसरी जोडी- २० ते २५ महिने वय असताना तिसरी जोडी- २४ ते ३१ महिने वय असताना चौथी जोडी- २८ ते ३५ महिने वय असताना शेळीच्या खालच्या जबड्यात दोन दात असतील तर तिला दोन दाती असे म्हणतात आणि अशी शेळी एक ते दीड वर्षाची असते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com