सोयाबीन खरेदीत मोठा घोळ, शेतकऱ्यांची फसवणूक भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांचा आरोपशेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करताना चिरमिरी घेतली जात आहे शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल?.Maharashtra Winter Session Nagpur 2025: विधानसभेत आज गुरुवारी शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी, सोयाबीन खरेदीचा (Soybean Procurement) घोळ कसा सुरु आहे? याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करताना चिरमिरी घेतली जात असून हा नालायक धंदा सुरु असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी (ता.११) २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा सुरु आहे..सरकारने ३१,७०० कोटींहून अधिक मदत दिली. यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला. सरकारची भावना प्रामाणिक असल्याचे त्यांनी नमूद केले..ते पुढे म्हणाले, ''सरकारने नाफेडला लवकर सोयाबीनची खरेदी सुरु करण्याची विनंती केली. नाफेडची एक बैठकदेखील झाली. मी त्या बैठकीत होतो. सोयाबीन खरेदी करणाऱ्या ज्या एजन्सी आहेत; त्यांचा एक ग्रेडर असतो. त्यांनी पास केले तरी तर गोडाऊनवर नाफेडचा ग्रेडर असतो. तिथे चिरीमिरी घेतली जाते अथवा शेतमाल नाकारला जातो. दोन ट्रक नाकारले तर खरेदी- विक्री संघाची एवढी परिस्थिती नाही तो १५-२० लाखांचा माल खरेदी करता येईल. नाफेडला सल्ला दिला की, खरेदी केंद्रावर तुमचा ग्रेडर ठेवा आणि गोडाऊनवरही तुमचाच ग्रेडर नेमा. तरीही अडचण यायला लागली. मी स्वतः खरेदी केंद्रावर गेलो. खरेदी केंद्रावर सोयाबीनचा १२ टक्के ओलावा दिसून आला. तर गोडाऊनवर १३ टक्के ओलावा भरला. तीन तासांच्या फरकानं ओलावा १ टक्के कसा वाढेल?. खोलात गेल्यावर लक्षात आले की खरेदी केंद्रावर जो ग्रेडर आहे त्याच्यांकडे वेगळे मीटर आणि गोडाऊनवर वेगळे मीटर आहे. असा नालायक धंदा करुन खरेदी केली जात आहे.''.Soybean Procurement Center: खरेदी केंद्रांचा ‘बाजार’ तेजीत.सोयाबीनचा ७० टक्के हंगाम निघून गेला आहे. सरकारची भावना कितीही प्रामणिक असली तरी खालचे अधिकारी, पणन खात्याचे जिल्हा अधिकारी, पणन मंडळ अशा पद्धतीने वागत असतील तर शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल, याचे चिंतन, मनन केले पाहिजे? असा सवाल सावरकर यांनी सभागृहात उपस्थित केला..Soybean Procurement Center: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक.हापूसचं जीआय मानांकन काढण्याचा डाव, भास्कर जाधव यांचा सरकारवर हल्लाबोलदरम्यान, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी, हापूसचं जीआय मानांकन काढण्याचा डाव असल्याचा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला. कोकणातील शेतकरी चिंतेत असून सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवं असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, अतिवृष्टी नुकसान मुद्यावर चर्चा सुरु असताना सभागृहात कृषिमंत्री, पशूसंवर्धन, महसूल मंत्री कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. जमिनी खरडून गेल्या. जमिनीचा पोत पुराखालून वाहून गेला. शेतकऱ्याला उभं करायचे असेल, तर ठोस उपाययोजना गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले. फळबागा, मत्स्यव्यवसाय हातातून गेला आहे. कोकणातल्या हापूस आंब्याला २०१८ मध्ये जीआय मानांकन मिळालं. पण ते आता काढून घेण्याचा डाव खेळला जात आहे. आमचा हापूस आंबा ४०० ते ५०० वर्षांपासून आंबा आहे. कोकण काही मदत मागत नाही. गुजरातला काहीही द्या, पण हापूसचं मानांकन नको, असे त्यांनी खडसावून सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.