Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन आजाराने बाधित ८० टक्के पशुधन उपचाराने बरे

जिल्ह्यातलम्पी स्कीन आजाराने बाधित एकूण पशुधनांपैकी जवळपास ८० टक्के पशुधन उपचाराने बरे झाले आहे. आधी दुहेरी राहणारी पशुधनाच्या मृत्यूची संख्या ही आता एकेरी राहत आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin) बाधित एकूण पशुधनांपैकी (Livestock) जवळपास ८० टक्के पशुधन उपचाराने बरे झाले आहे. आधी दुहेरी राहणारी पशुधनाच्या मृत्यूची संख्या ही आता एकेरी राहत आहे. असे असले तरी पशुपालकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनांची संख्या ५ लाख ३८ हजार ५७२ इतकी, तर उपचार केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. १५ डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची लागण झालेल्या पशुधनांची संख्या ९७३८ इतकी होती. त्यापैकी जवळपास ७८०४ पशुधन उपचारांती बरे झाले तर १०१७ पशुधनांवर दिशा निर्देशित केलेल्या पद्धतीनुसार उपचार सुरू आहेत.

आधी जिल्ह्यात दर दिवशी मृत्यू होणाऱ्या पशुधनाचा आकडा हा दुहेरी असायचा. तो आता एकेरी संख्येवर आला आहे. जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरण आधीच पूर्ण झाले आहे. याशिवाय केंद्रीय पथकाने जिल्ह्यात दिलेल्या भेटीत लम्पी स्कीन आजार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनेविषयी समाधान व्यक्त केले होते. लम्पी स्कीन आजार जिल्ह्यात नियंत्रित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.

लम्पी स्कीन आजारामुळे मृत्यू होणाऱ्या पशुंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आजार नियंत्रित असला तरी प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी पशूंना पोषक आहार तसेच गोठा स्वच्छते विषयी पशुपालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे.

- प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, औरंगाबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT