Lumpy Skin : सव्वा तेरा हजार जनावरांची साडे तेहतीस कोटींची मदत

गेल्या सहा महिन्यापासून पशुपालकांना हैराण करून सोडलेल्या लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत राज्यात २५ हजार शेतकऱ्यांच्या सुमारे २६ हजार ४७० जनावरांचा मृत्यू झाला आहे.
Lumpy Skin Disease | Lumpy Skin Disease in Cattle | Lumpy Skin Disease  Treatment
Lumpy Skin Disease | Lumpy Skin Disease in Cattle | Lumpy Skin Disease TreatmentAgrowon
Published on
Updated on

नगर ः गेल्या सहा महिन्यापासून पशुपालकांना हैराण करून सोडलेल्या लम्पी स्कीनमुळे (Lumpy Skin) आतापर्यंत राज्यात २५ हजार शेतकऱ्यांच्या सुमारे २६ हजार ४७० जनावरांचा मृत्यू (Animal Death) झाला आहे. नगर, बुलडाणा, अमरावती, जळगाव, सोलापूर जिल्ह्यांत मृत जनावरांची संख्या अधिक आहे. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्या पुढाकाराने शासनाकडून आतापर्यंत १३ हजार २४४ जनावरांपोटी १२ हजार ४७१ पशुपालकांना ३३ कोटी ४७ लाख १९ हजार रुपयांची शासनाने मदत दिली.

Lumpy Skin Disease | Lumpy Skin Disease in Cattle | Lumpy Skin Disease  Treatment
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे १३७ जनावरे दगावली

कोरोना संकटातून बाहेर पडलेल्या दूध उत्पादक, पशुपालकांसाठी नवे संकट उभे राहिले. राज्यात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जनावरांना लम्पी स्कीनची बाधा होऊ लागली. गेल्यावर्षीही हा आजार होता. मात्र यंदा त्याची तीव्रता अधिक आहे. लम्पी स्कीनची बाधा रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून प्रयत्न केले गेले.

Lumpy Skin Disease | Lumpy Skin Disease in Cattle | Lumpy Skin Disease  Treatment
Lumpy Skin : लम्पी स्कीनचा प्रकोप रिसोडमध्ये सरूच

पशुधनाचे लसीकरण केले. मात्र तरीही बाधा होण्याचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही. आतापर्यंत राज्यात पावणे चार लाख जनावरांना या आजाराची बाधा झाली. उपचारातून तीन लाख जनावरे बरी झाली आणि २६ हजार ४७० जनावरांचा मृत्यू झाला आहे. नगर, बुलडाणा, अमरावती जळगाव, सोलापूर जिल्ह्यात मृत जनावरांची आणि बाधा होणाऱ्या जनावरांची संख्या अधिक आहे.

Lumpy Skin Disease | Lumpy Skin Disease in Cattle | Lumpy Skin Disease  Treatment
Lumpy Skin : सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव

जनावरांच्या बाजारातील किमती पाहता जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मृत जनावरांची भरपाई म्हणून पशुपालकांना गाईसाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५ हजार रुपये व वासरासाठी १६ हजार रुपये मदत दिली जात आहे. आतापर्यंत ६ हजार ९० गाईंसाठी १८ कोटी २१ लाख, ४ हजार १६७ बैलांसाठी १० कोटी ४५ लाख ३२ हजार तर २ हजार ९८७ वासरांसाठी ४ कोटी ८० लाख ७१ हजार रुपयांची मदत दिली आहे. अजून सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

लम्पी स्कीनमुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे, अशा पशुपालकांना सरकार मदत करत आहे. आतापर्यंत साडेबारा हजार पशुपालकांच्या सव्वा तेरा हजार जनावरांची ३३ कोटी ४७ लाखांची मदत दिली आहे. राहिलेल्या पशुपालकांना लवकरच मदत दिली जाईल.
राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल व पशुसंवर्धनमंत्री.

आकडे बोलतात

- बाधित तालुके ः ३३५

- गावे ः ३९८५

- पाच किलोमीटर परिघातील गावे ः २०,३७३

- एकूण बाधित जनावरे ः ३ लाख ७५ हजार ५७६

- उपचाराने बरी झालेली जनावरे ः २ लाख ९६ हजार ५७४

- मृत जनावरे ः २६,७४०

- एकूण लसीकरण ः १ कोटी ४० लाख

(ता. १२ डिसेंबर अखेर, स्त्रोत पशुसंवर्धन विभाग)

मदत दिलेली जनावरे (कंसात एकूण मृत्यू)

जळगाव ः १८३२ (२४२६), नगर ः २१२२ (३२०३), धुळे ः ९४ (१४९), अकोला ः १४२० (२०३७), पुणे ः २९२ (६९९), लातुर ः १५१ (२४५), औरंगाबाद ः ४३०(९०४), बीड ः १०२ (६८४), सातारा ः ६३६ (११७०), बुलडाणा ः २०८१ (४६०२), अमरावती ः १४२४ (२४९४), उस्मानाबाद ः ८१ (२१५), कोल्हापुर ः ३२९ (५२९), सांगली ः ३१८ (१०२४), यवतमाळ ः १०७ (६२०), परभणी ः ११७ (१८९), सोलापुर ः ४७६ (२१४४), वाशीम ः २२२ (७२८), नाशिक ः ७५ (१०७), जालना ः२२३ (७८६), पालघर ः १ (३), ठाणे ः ५६ (७६), नांदेड ः १४० (३२७), नागपूर ः ११८ (२०६), चंद्रपूर ः १७ (२७), हिंगोली ः ७७ (१४५), रायगड ः २१ (२९), नंदुरबार ः १२३ (२३७), वर्धा ः ६३ (१८५), रत्नागिरी ः १ (७८), गोंदिया ः १०(१०२), सिंधुदुर्ग ः ० (१९), भंडारा ः ८३ (१०२), गडचिरोली ः २ (४).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com