lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : चिपळूणमध्ये ६ जनावरांचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने बळी घेतला. कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी गावांतील प्रत्येकी एक पशुधन या आजारामुळे दगावले असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

Team Agrowon

चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease) बळी घेतला. कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी गावांतील प्रत्येकी एक पशुधन (Livestock) या आजारामुळे दगावले (Animal Death) असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

या परिस्थितीमुळे येथील पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला असून लम्पी स्कीनसदृश लक्षणे दिसणाऱ्या जनावरांवर तत्काळ उपचार सुरू केले आहेत. तसेच तालुक्यात ३० हजार ८०६ जनावरांना लम्पी स्कीनची लसही देण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी श्री. बारपात्रे यांनी दिली.

चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये लम्पी स्कीनसदृश आजाराची जनावरे आढळली होती. त्यांच्या वैद्यकीय तपासणीअंती व नमुन्यांच्या अहवालानुसार काही जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. आतापर्यंत आढळलेली लम्पी स्कीनसदृश जनावरे व लम्पी स्कीनग्रस्त जनावरांवर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.

यामध्ये कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी येथील शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक जनावर लम्पी स्कीनमुळे दगावल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी त्यानंतर या जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या. तसेच त्या-त्या गावांतील व परिसरातील सर्वेक्षणही करण्यात आले.

तालुक्यात लम्पी स्कीन आजाराची साथ पसरू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष काळजी घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर लम्पी स्कीन लसीकरणावर भर देण्यात आला आहे. शासनाने पाठविलेल्या ३१ हजार ३०० लसींमधून ३० हजार ८०६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT