Lumpy Skin : वासरांभोवती आवळतोय ‘लम्पी स्कीन’चा विळखा

नव्याने ३० टक्के प्रकरणे वासरांत; सोलापूर, नगरची भर
Lumpy Skin in calf
Lumpy Skin in calfAgrowon
Published on
Updated on


विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : ‘लम्पी स्किन’ (Lumpy Skin) चा सर्वांत आधी प्रादुर्भाव झालेल्या अकोला, अमरावती, बुलडाणा, जळगाव जिल्ह्यांत मृत्युदर नियंत्रणात आल्याचा दावा केला जात आहे. तरीही नव्याने सोलापूर, नगर जिल्ह्यांत या आजाराची तीव्रता वाढल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे नव्याने ३० टक्के आजाराची प्रकरणे ही वासरांत आढळून आली आहेत.

Lumpy Skin in calf
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा विळखा वाढला

राज्यात मंगळवार (ता. ६) अखेर ३५ जिल्ह्यांमधील एकूण ३९५२ संसर्ग केंद्रांत ‘लम्पी स्किन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तेथील एकूण तीन लाख ५४ हजार २४७ बाधित पशुधनांपैकी एकूण दोन लाख ७१ हजार ४६५ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत. २४ हजार ६६७ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. राज्यातील जनावरांमध्ये आढळलेला आणि राजस्थानमधील जनावरांमध्ये आढळलेला लम्पी स्कीन विषाणू एकच असल्याचा दावा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रयोगशाळांकडून करण्यात आला आहे.

Lumpy Skin in calf
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रकोप थांबता थांबेना

सुरुवातीला या विषाणूमुळे जनावरांच्या बाहेरच्या त्वचेवर गाठी येत होत्या. आता हा विषाणू जनावरांच्या आतील भागास देखील हानी पोहोचवत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी या संदर्भातील निरीक्षण नोंदवीत आहे.
दरम्यान, लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव सर्वांत आधी अकोला, अमरावती, बुलडाणा, जळगाव या जिल्ह्यांमध्ये झाला होता. या जिल्ह्यांमध्ये याची तीव्रता देखील अधिक होती. ६० ते ७० जनावरांचा मृत्यू दररोज व्हायचा. आता या ठिकाणी आजार नियंत्रणात येत मृत्यूचे प्रमाणदेखील दर दिवसाला २० वर आले आहे.

नगर जिल्ह्यातील राशीन भागात, जळगाव, अमरावती येथे सप्टेंबरपासून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची टीम परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. राज्यात सुरुवातीला गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिसून आला होता. या जनावरांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. त्यानंतर आता वासरांमध्ये ३० टक्के प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे वासरांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘गोट पॉक्स’ ही लस यासाठी पूर्णपणे प्रभावी नाही. ६० ते ७० टक्के नियंत्रण यामुळे मिळू शकते. मात्र अशा जनावरांच्या संपर्कात लसीकरण न झालेले जनावर आल्यास त्यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक राहते, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे वासरांच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला, असेही पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Lumpy Skin in calf
Lumpy Skin : सोलापुरात ‘लम्पी’चा वाढता विळखा

....
चौकट ः
सर्वाधिक प्रभावितमध्ये नवीन जिल्ह्यांची भर
ज्या जिल्ह्यांमध्ये लम्पी स्किनची तीव्रता कमी होती, अशा नवीन जिल्ह्यांची भर पडली आहे. त्यामध्ये सोलापूरचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असून सातारा, सांगली, मराठवाड्यातील जालना, बीड तसेच विदर्भातील वाशीम व यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित जिल्हे ठरले आहेत.
---
कोट ः
लम्पी स्कीनच्या निदानासाठी यापूर्वी भोपाळ येथे एकमेव प्रयोगशाळा होती. त्यानंतर पुणे येथील प्रयोगशाळेला मान्यता देण्यात आली. आता नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला देखील केंद्र सरकारकडून निदानविषयक मान्यता देण्यात आली आहे.
- डॉ. अनिल भिकाने, विस्तार शिक्षण संचालक,
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
--
लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता अनेक अडचणी असताना त्याचा बाऊ न करता पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकांनी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली. मात्र याचा प्रसार थांबविण्यासाठी इतर विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे. कोरोना काळात वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला गेला. तशी स्वच्छता गोठ्यांची हवी. त्या माध्यमातूनच प्रसार रोखणे शक्य होईल.
- डॉ. रामदास गाडे, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com