lumpy skin disease in Parbhani Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ५१० जनावरे दगावली

गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण २८ हजार ९ आहे.

Team Agrowon

Parbhani News: लम्पी स्कीन (Lumpy Skin) रोगामुळे परभणी-हिंगोली जिल्ह्यांतील ७ हजार ११६ जनावरे बाधित झाली आहेत. उपचारानंतर ४ हजार ५९७ जनावरे बरी झाली आहेत. परंतु ५१० जनावरे दगावली (Animal Death) आहेत. ‘लम्पी’मुळे वासरांमध्ये मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.

आजवर या दोन जिल्ह्यांतील २९७ वासरे दगावली आहेत. या दोन जिल्ह्यांत सध्या या रोगाचे २ हजार ८ जनावरे सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या (Department of Animal Husbandry) सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात रविवार (ता. २९) अखेर लम्पी स्कीनबाधित जनावरांची संख्या ३ हजार ८३५ झाली आहे. उपचारानंतर २ हजार ३ जनावरे बरी झाली आहेत.

परंतु ३२४ जनावरे दगावली आहेत. सध्या या आजाराच्या सक्रिय जनावरांची संख्या १ हजार ५०८ असून, त्यापैकी ५६ जनावरे गंभीर आहेत.

आजवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील लम्पीबाधित जनावरांमध्ये गायवर्गीय १ हजार ५०३ आणि बैलवर्गीय २ हजार २३३२ जनावरांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १४४ ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६२६ आहे. लम्पी स्कीन दगावलेल्या ३२४ जनावरांमध्ये गायी ४७, बैल ८८, वासरे १८९ आहेत.

गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण २८ हजार ९ आहे. रविवार (ता. २९) पर्यंत एकूण २ लाख ९७ हजार २५४ जनावरांचे (९९.१३ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे.

या आजाराची साथ नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

हिंगोलीत १८६ जनावरे दगावली...

हिंगोली जिल्ह्यात १५ सप्टेंबर २०२२ रोजी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. लम्पी स्कीन रोगामुळे सोमवार (ता. ३०) पर्यंत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ९२ ईपी सेंटरसह ३६६ बाधित गावातील ३ हजार २८० जनावरे बाधित झाली आहेत.

उपचारानंतर २ हजार ५९४ जनावरे बरी झाली. परंतु १८६ जनावरांचा मृत्यू झाला. मृत जनावरांमध्ये ३६ गायी, ४३ बैल आणि १०८ वासरे आहेत.

बाधित क्षेत्रातील २ लाख २२ हजार १५७ जनावरे, स्वच्छ क्षेत्रातील १६ हजार ४९६ जनावरे आणि खासगी लसीकरण केलेली ९ हजार ८०० जनावरे मिळून एकूण २ लाख ३८ हजार ६५३ जनावरांचे (१०२.७८ टक्के) लसीकरण करण्यात आले.

या अंतर्गत अर्थसाह्यासाठी १७४ प्रस्ताव प्राप्त असून, त्यापैकी १६६ प्रस्ताव मंजूर आहेत. आजवर १०० पशुपालकांना २१ लाख ५ हजार रुपये अर्थसाह्य अदा केले, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT