Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेड जिल्ह्यात ४२९ पशुधनाला ‘लम्पी स्कीन’ची बाधा

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत ४२९ गायवर्ग पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत ४२९ गायवर्ग पशुधनाला (Livestock Infected By Lumpy Skin) ‘लम्पी’ची बाधा झाली आहे. तर २६ जनावरांचा मृत्यू झाले आहेत. लम्पी स्कीन आजाराने मृत (Animal Died Due To Lumpy Skin) झालेल्या जनावराच्या नऊ पशुपालकांना अर्थसाह्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. परंतु बाधित जनावरांच्या संख्येत रोज भर पडत आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तीन लाख ७९ हजार १२ पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

बाधित ६३ गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ४२२ गावांतील एक लाख १४ हजार २६८ जनावरांची संख्या आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या २६ झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील स्थिती अशी...

आजच्या घडीला जिल्ह्यातील ६३ गावे लम्पी बाधित आहेत. या ६३ गावांत एकूण २९ हजार ८३१ गाय वर्ग जनावरे आहेत. यातील ४२९ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या ३५९ झाली आहे. एकूण बाधित गावांची संख्या ४२२ झाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन

Seed Scam: शेतकऱ्यांचे आयुक्तालयाच्या छतावर आंदोलन; धाराशिव निविष्ठा घोटाळा प्रकरण

Heavy Rainfall Relief: मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे १६ हजार कोटी खात्यात जमा; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT