Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lampy Skin : ‘लम्पी स्कीन’बाधित ४ हजार ९६४ जनावरे उपचारानंतर बरी

Team Agrowon

Parbhani Lampy Skin Update : परभणी - हिंगोली जिल्ह्यामधील बुधवार (ता. ८)पर्यंत एकूण ७ हजार २३६ जनावरांना लम्पी स्कीन रोग (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव झाला आहे. उपचारानंतर ४ हजार ९६४ जनावरे बरी झाली आहेत.

या दोन जिल्ह्यांतील ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळून येत आहे. परिणामी, सक्रिय जनावरांची संख्येत घट झाली आहे. सध्या या जिल्ह्यात १ हजार ७४७ जनावरे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण ५२५ जनावरांचा या आजारामुळे मृत्यू (Animal Death Due To Lumpy Skin) झाला.

बाधित पशुपालकांना आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या (Department Of Animal Husbandry) सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात बुधवार (ता. ८) अखेर लम्पी स्कीनबाधित जनावरांची संख्या ३ हजार ९२७ झाली आहे. उपचारानंतर २ हजार ३११ जनावरे बरी झाली आहेत. परंतु ३३८ जनावरे दगावली आहेत.

सध्या या आजाराच्या सक्रिय जनावरांची संख्या १ हजार २७८ असून, त्यापैकी ४४ जनावरे गंभीर आहेत. ‘लम्पी’बाधित जनावरांमध्ये गायवर्गीय १ हजार ५३६ आणि बैलवर्गीय २ हजार ३९१ जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती.

जिल्ह्यातील १४४ ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परीघातील गावांची संख्या ६२६ आहे. लम्पी स्कीनमुळे दगावलेल्या ३३८ जनावरांमध्ये गायी ४७, बैल ९० वासरे २०१ आहेत.

जिल्ह्यात बुधवार (ता. ८)पर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ४६९ वासरे, असे एकूण २ लाख ९७ हजार २५४ जनावरांचे (९९.१३ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

हिंगोलीत २ हजार ६५३ जनावरे बरी....

हिंगोली जिल्ह्यात १५ सप्टेंबर २०२२ रोजी लम्पीरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. लम्पी स्कीन आजारामुळे बुधवार (ता. ८)पर्यंत जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ९२ ईपी सेंटरसह ३६६ बाधित गावातील ३ हजार ३०९ जनावरे बाधित झाली आहेत.

उपचारानंतर २ हजार ६५३ जनावरे बरी झाली. परंतु १८७ जनावरांचा मृत्यू झाला. मृत जनावरांमध्ये ३६ गायी, ४३ बैल आणि १०८ वासरे आहेत. जिल्ह्यात सध्या या आजाराची ४६९ जनावरे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जनावरे गंभीर आजारी आहेत.

जिल्ह्यात एकूण २ लाख ४१ हजार ८०० लसींचा पुरवठा करण्यात आला. बाधित क्षेत्रातील २ लाख २२ हजार १५७ जनावरे, स्वच्छ क्षेत्रातील १६ हजार ४९६ जनावरे आणि खासगी लसीकरण केलेली ९ हजार ८०० जनावरे मिळून एकूण २ लाख ३८ हजार ६५३ जनावरांचे (१०२.७८ टक्के) लसीकरण करण्यात आले.

याअंतर्गत अर्थसाह्यासाठी १७४ प्रस्ताव प्राप्त असून, त्यापैक १६६ प्रस्ताव मंजूर आहेत. आजवर १०० पशुपालकांना २१ लाख ५ हजार रुपये अर्थसाह्य अदा केले, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT